वळण/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील वळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गोविंद सारंगधर...
वळण/प्रतिनिधी
यावेळी नुतन अध्यक्ष गोविंद फुणगे यांनी सांगितले की,सर्व प्रथम कोरोना मुळे शिक्षक -विद्यार्थी-पालक यांच्या मधे काहीसा संवाद कमी झाला आहे.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमधे गरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहीले आहे.त्यामुळे आता पुढील काळात लवकरच शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा सर्व प्रथम प्रयत्न केला जाईल.तसेच शाळेतील कमी असलेले शिक्षक आणण्याचा प्रयत्न करू आणि अपुऱ्या वर्ग खोल्यांच्या प्रश्नासंदर्भात व नवीन जागेत शाळा स्थलांतरीत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताञय खुळे, अशोक कुलट,मनोज गोसावी, गोपीनाथ खुळे, सुनिल खिलारी, सुनिल पारे केंद्रप्रमुख मंगला सोळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोमवारी शाळेच्या सभागृत हि निवड प्रक्रिया संपन्न झाली.व्यासपीठावर उपसरपंच एकनाथ खुळे, संजय शेळके, सुभाष ठाकर,ग्रामसेवक संतोष राठोड,तलाठी रवींद्र बाचकर,पोलीस पाटील सोमनाथ डमाळे,प्रकाश आढाव, पञकार वसंत आढाव, संजय आढाव,निवृत्ती आढाव,विजय ठुबे, संतोष बनकर,फकिरचंद फुणगे, रोहिदास रंधे, हरीभाऊ मिसाळ आदि पालकांसह निरीक्षक म्हणून केंद्र प्रमुख मंगला सोळसकर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी सर्व नुतन पदाधिका-यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप शेळके सर यांनी तर आभार कल्पना सुपेकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत