देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा - राहुरी फॅक्टरी(मधला रोड) मार्गावर मुसमाडे वस्ती, गणेश नगर परिसरात भर दिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्...
देवळाली प्रवरा
येथील देवळाली प्रवरा - राहुरी फॅक्टरी(मधला रोड) मार्गावर मुसमाडे वस्ती, गणेश नगर परिसरात भर दिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांतून घबराट पसरली आहे. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी शेतकरी व इतर नागरिक प्रवास करत नव्हते. आता दिवसाही प्रवास टाळणे गरजेचे बनले आहे.
*बिबट्याचा व्हिडीओ*
देवळाली प्रवरा परिसरातील गणेशनगर, मुसमाडे वस्ती, चोथे वस्ती येथे गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे. रात्रीच्यावेळी बिबट्या कायम देवळाली प्रवरा- राहुरी फॅक्टरी रोडवरून प्रवास करताना अनेकांना पहावयास मिळाला. मात्र आता भर दिवसा या भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणे अवघड बनले आहे. दोन दिवसांपूर्वी मुसमाडे वस्ती येथे सोयाबीनच्या शेतात दुपारच्या वेळी बिबट्या असल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाला आहे. काल रात्रीही या भागात बिबट्या नजरेस पडला.
दरम्यान देवळाली- फॅक्टरी रोडवर वनविभागाने पिंजरा लावलेला आहे. मात्र त्या पिंजऱ्यात कुठेही भक्ष्य(कोंबडी, शेळी) नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात अडकणे अशक्य आहे.वनविभागाने या भागात वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी केली आहे. तसेच रात्री व दिवसा या भागातून दुचाकी, सायकल अथवा पायी प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत