कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भावेश थोरात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भावेश थोरात

  कोपरगाव/प्रतिनिधी कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भावेश थोरात यांची नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्...

 कोपरगाव/प्रतिनिधी

कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भावेश थोरात यांची नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेससह समर्थकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी भावेश थोरात यांना निवडीचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अशोक काळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे, विचार आणि योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि युवकांचे संघटन वाढविण्यासाठी थोरात यांची निवड केली असल्याचे शहराध्यक्ष कुरेशी यांनी नमूद केलेले आहे.

 तर निवडीनंतर बोलताना थोरात म्हणाले, यापूर्वी देखील विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी निभावलेली आहे. यापुढेही अशीच प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळून शहराध्यक्ष सुनील गंगुले आणि युवक शहराध्यक्ष कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यास कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत