सात्रळ(वेबटीम) येथे नुकतेच वित्त आयोगाच्या निधीतून गावातील रस्ते मजबुतीकरण तसेच काँक्रिटीकरणाचा कामांची कार्यक्रम ग्रामपंचायतने हा...
सात्रळ(वेबटीम)
येथे नुकतेच वित्त आयोगाच्या निधीतून गावातील रस्ते मजबुतीकरण तसेच काँक्रिटीकरणाचा कामांची कार्यक्रम ग्रामपंचायतने हाती घेतला आहे, त्यानुसार गावातील पारिजातक गल्लीतील काँक्रिटीकरणाचे काम सुरु झाले.
या रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून या भागातील निवडून आलेले ग्रामपंचायतचे जेष्ट सदस्य रमेश पन्हाळे, सात्रळचे युवा सरपंच सतीश ताठे, उपसरपंच तांबोळी, ग्राम विस्तार अधिकारी हैदरभाई पटेल पंचायत समितीचे शिंदे, गौते, अकोलकर हे अधिकारी स्वतः जातीनिशी साईटवर दिवसभर उभे राहून सदर कामावर देखरेख करताना आढळून आले आहेत. ठेकेदार सीताराम शिंदे हे स्वता उभे राहून काम करून घेत आहेत.
ठेकेदाराला कामात कोणतीही कुचराई होऊ न देण्याची स्पष्ट भाषेत समज दिली गेली असून काँक्रिट च्या माल बनविताना सुद्धा ग्रामस्थ लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले आहेत.
सात्रळ ग्रामपंचायत सदस्य चा हा आदर्श इतर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला तर ग्रामसुधारण चांगल्या प्रकारे होऊ शकते, याची सर्वत्र चर्चा होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत