नगराध्यक्ष वहाडणे यांच्या टीकेला अकबर शेख यांचे पुन्हा जोरदार प्रत्युत्तर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगराध्यक्ष वहाडणे यांच्या टीकेला अकबर शेख यांचे पुन्हा जोरदार प्रत्युत्तर

कोपरगाव/प्रतिनिधी अफगाणिस्तान येथील सत्ता संघर्षाबद्दल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी तीव्र शब्दांत निषेध करण्याचे आवाहन केले होते. त्यावर विद...

कोपरगाव/प्रतिनिधी

अफगाणिस्तान येथील सत्ता संघर्षाबद्दल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी तीव्र शब्दांत निषेध करण्याचे आवाहन केले होते. त्यावर विद्रोही साहित्यिक अकबर शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून भाष्य केलं होतं. त्यानंतर पुन्हा नगराध्यक्षांनी केलेल्या टीकेवर शेख यांनी तोफ डागली आहे.

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. याचे जगभरात पडसाद उमटत आहे. याचा निषेध करवा म्हणून नगराध्यक्ष वहाडणे यांनी सूचित केले होते. त्याचा निषेध करून त्यानुसारच अखलाखची हत्त्या करणाऱ्यांचा निषेध करू, रुद्रवाडी (ता. उदगीर) येथील मातंग कुटुंबावर मंदिरात प्रवेश केला म्हणून गाव सोडावे लागले त्या वर्णवाद्यांचा निषेध करू, माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील मातंग व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला जागा दिली नाही या घटनेचाही निषेध करू, ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटतो त्यांनी संविधान जाळले त्या संविधान जाळणाऱ्या देशद्रोही प्रवृत्तीचाही निषेध करू, जम्मू-काश्‍मीर काठुआ येथील येथील नऊ वर्षांच्या बालिकेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली या घटनेचा देखील निषेध करू.भारतातील काही तालिबानी प्रवृत्तींचाही आणि देश विकणाऱ्यांचाही निषेध करू. पण निषेध व्यक्त करण्याआधी हे आपल्याला जमेल का? असा खोचक सवाल शेख यांनी विचारला आहे.



याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांचा वारस असून त्यांच्या विचारांवरच वाटचाल करत आहे. त्यामुळे माझ्यावर टीका जरुर करा, पण विचारांची लढार्इ विचारांनी लढा. माझ्या संपूर्ण दिनचर्यवर जरुर वॉच ठेवा. मात्र, शहरातील जनतेला दिलेल्या आश्‍वासनांना आणि समस्यांचाही तितक्याच ताकदीने निपटरा करा, असा उपरोधिक टोलाही लगावला आहे. यावरुन नगराध्यक्ष व शेख यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी नागरिकांसाठी चर्चेच्या विषय ठरल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत