राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) येथे करदाता हीच राष्ट्राची संपत्ती हे ब्रीद असलेल्या गौरीश रविंद्र राऊत यांच्या अकाउंट्स आणि ऑडिट सर्विसेस या कार्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथे करदाता हीच राष्ट्राची संपत्ती हे ब्रीद असलेल्या गौरीश रविंद्र राऊत यांच्या अकाउंट्स आणि ऑडिट सर्विसेस या कार्यालयाचे उद्घाटन जेष्ठ नेते माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रेरणा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मुंबई येथील जी.एस.टी कार्यालयाचे सहायक आयुक्त दत्तात्रय भिसे, नाशिक कार्यालयाचे बाळासाहेब होले, अहमदनगर कार्यालयाचे डॉ. रविंद्र कचरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या कार्यालयांतर्गत जी.एस. टी, आयकर, व्हॅट, अग्रीम आयकर, अकाउंट ऑडिट सेवा आदी सेवा करदात्यांना दिल्या जाणार आहेत.
नगर जिल्ह्यातील नावाजलेले ऑडटर रविंद्र राऊत यांनी करदात्यांची गरज ओळखून आपले सुपुत्र गौरीश राऊत यांना राहुरी फॅक्टरी शहरात कार्यालय उघडून दिले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑडिटर गौरीश राऊत, कार्यालय प्रमुख सोमनाथ ओहोळ यांनी विशेष मेहनत घेतली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत