कोपरगाव तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार – आ. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी- जीवघेण्या कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची निर्माण झालेल्या अभूतपूर्व टंचाईमुळे कोरोना बाधित अनेक गंभीर रुग्...

कोपरगाव प्रतिनिधी-

जीवघेण्या कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची निर्माण झालेल्या अभूतपूर्व टंचाईमुळे कोरोना बाधित अनेक गंभीर रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र यापुढे अशी परिस्थिती पुन्हा उदभवनार नसून कोपरगाव तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होईल असा आशावाद आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.


                        कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती त्यावेळी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सुरु करण्यात आले होते. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची त्यांनी नुकतीच पाहणी केली यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती सुरु होणार आहे. 


तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून ५० बेडच्या कोविड वार्डचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पात लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना जिल्ह्यातील काही तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही. तिसरी लाट कधीही आली तरी त्यादृष्टीने आपण तयारी करीत आहोत.आपण केलेल्या सर्व प्रकारच्या उपाय योजनांमुळे तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र शासनाने नुकतेच निर्बध शिथिल केले आहेत. 



त्यामुळे पुन्हा गर्दी वाढून बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरी आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असलो तरी थोडासा गाफिलपणा महागात पडू शकतो हे नाकारून चालणार नाही. त्यासाठी कोरोनाचे समूळ उच्चाटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी वेळ पडल्यास अजूनही उपाय योजना कराव्या लागल्या तरी करू मात्र थांबायचे नाही असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

 यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, दिनकर खरे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड,  डॉ. अमोल अजमेरे, डॉ. अतिश काळे, डॉ. तुषार गलांडे, योगेश नरोडे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे संचालक प्रसाद कातकडे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ.विकास घोलप, डॉ. वैशाली बडदे आदी उपस्थित होते.


          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत