राहुरी(वेबटीम ) शिक्षकनेते व उपक्रमशील शिक्षक कल्याण राऊत गुरुजी यांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थीनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारन्याचा उप...
राहुरी(वेबटीम)
शिक्षकनेते व उपक्रमशील शिक्षक कल्याण राऊत गुरुजी यांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थीनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारन्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन राहुरी खुर्दचे उपसरपंच तुकाराम पा बाचकर यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटुबे आखाडा येथील प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.उपक्रमशील शिक्षक श्री कल्याण राऊत यांनी इयता आठवीतील विद्यार्थीनी कु कावेरी शांताराम शेवाळे हिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.तिला आवश्यक शालेय साहित्य ग्रामस्थांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी राहुरी खुर्दच्या सरपंचा सौ मालती ताई साखरे,शिवाजीराव पवार,शिवाजी शेंडे,मधुकर साळवे,भवार पाटील ,ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बाचकर,उमेश बाचकर,कुंडलिक बाचकर,शिवाजी शेंडे,मीनाताई घोक्षे,मनीषा शेंडे, शिवाजी पवार,मधुकर साळवे,मधुकर भवार,बाळु दाभाडे,श्री कल्याण राऊत सर,श्रीम संध्या जपकर,श्रीम संजीवनी राऊत,श्रीम अनिता मोरे,श्रीम सुनिता कल्हापुरे, श्रीम छाया निमसे,श्रीम वैशाली गायकवाड श्रीम राणी साळवे,श्रीम अमृता वनारसे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत