जलसंधारण मंत्री गडाख यांचा प्रयत्नाने सोनई- करजगाव१८ गांव पाणी योजना सर्व्हसनाला भर पाऊसात सुरुवात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जलसंधारण मंत्री गडाख यांचा प्रयत्नाने सोनई- करजगाव१८ गांव पाणी योजना सर्व्हसनाला भर पाऊसात सुरुवात

नेवासा/बाळासाहेब नवगिरे:-   राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा प्रयत्नाने तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभा...

नेवासा/बाळासाहेब नवगिरे:-


 राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा प्रयत्नाने तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांचा मार्गदर्शनाखाली, दि.३१ रोजी पानेगांव.     (ता. नेवासा) येथे सोनई- करजगांव १८ गांव पाणी योजना वाढीव पाईपलाईन सर्व्हसनाला भर पाऊसात सुरुवात झाली .पाणी योजनेचे अध्यक्ष संजय जंगले यांचा हस्ते प्रारंभ करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत नेवासे तालुक्यात कार्यान्वीत असलेल्या पाणी योजना व नवीन योजनांचा मंत्री शंकरराव गडाख यांचा पाठपुराव्याने नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे.या योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावेत असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.नेवासे तालुक्यात चार नवीन व चार जुन्या पाणी योजने बाबत बैठकीत सखोल विचार करण्यात आला आहे.या योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देत पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत एजन्सीने आज रोजी प्रत्यक्षात सुरुवात केली. यावेळी पानेगावचे  उपसरपंच रामभाऊ जंगले, किशोर जंगले, सतिश जंगले, रमेश जंगले, बाबासाहेब शेंडगे ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत एजंन्सी एस इंजिनिअरिंग मुंबई  साइट इंजिनिअर गणेश पालवे, अभिजित पाटील,तिरुपती बिराजदार, रणवीर वाघमारे,सुमित भालेराव,सुशांत मंडल योजनेचे कर्मचारी किरण शेलार, संतोष कणगरे,दिलीप शिरोळे,किरण जाधव, योजनेचे सचिव संतोष खंडागळे  सोनई,करजगांव,पानेगांव,शिरेगांव, अंमळनेर,निंभारी,खुपटी,तामसवाडी,वाटापूर,गोमळवाडी,. बेल्हेकरवाडी,खेडलेपरमानंद,लांडेवाडी, गणेशवाडी, नवीन चांदगांव,गोणेगांव,इमामपूर आदी गावांचा समावेश असून पुर्ण  वाड्या,वस्त्या ठिकाणी हि योजना जाणार असल्याचे सोनई करजगांव १८ गांव पाणी योजनेचे अध्यक्ष संजय जंगले यांनी सांगितले.

 सोनई -करजगांव १८ गांव पाणी योजना राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा प्रयत्नाने व जिल्हा परिषद सभापती सुनिल गडाख यांचा मार्गदर्शनाखाली वाढीव पाईप लाईन सर्व्हसनाला आज रोजी सुरुवात झाली असून १८ गावात वाड्या वस्त्या ह्या योजनेचा लाभ होणार असल्याचे अध्यक्ष  संजय जंगले यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत