कोपरगाव/प्रतिनिधी:- ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर फेरीवाल्याने त्याच्याकडील हत्यार...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना फेरीवाल्याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन हाताची तीन बोटे तोडली.
तसेच अंगरक्षकावर देखील हल्ला केला. यामध्ये ते देखील गंभीर जमखी झाले आहेत. महिला अधिकार्यावरील या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना नाशिक विभागाच्यावतीने कोपरगाव पालिका अधिकारी-कर्मचार्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता एकदिवसीय काम बंद आंदोलन केले.
या प्रकरणी हल्लेखोरावर तत्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, पाणी पुरवठा अभियंता ऋतुजा पाटील यांसह अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे. या निवेदनावर नाशिक विभाग उपाध्यक्ष, अहमदनगर जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कोपरगाव अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षर्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत