कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव परिसरातील भास्कर वस्ती येथे एकास मारहाण करून जबरीने पैशाची बॅग चोरुन नेणाऱ्या आरोपीना पोलीसांनी केले जेरबंद केले...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव परिसरातील भास्कर वस्ती येथे एकास मारहाण करून जबरीने पैशाची बॅग चोरुन नेणाऱ्या आरोपीना पोलीसांनी केले जेरबंद केले आहे.
कोपरगाव सुमित विजय शिंदे , नोकरी श्रीराम फायनान्स येवला . रा . गजानननगर कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि २१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास त्यांचे फायनान्स चे कामकाज संपवून कोपरगाव कडे येत असतांना भास्कर वस्ती जवळून जात असताना मला एका मोटार सायकलवरील अज्ञात तीन इसमांनी शिर्डी किती किलोमीटर आहे.असे विचारले असता मी माझी मोटार सायकल थांबवून शिर्डी चा रस्ता सांगितला तेव्हा त्यातील एकाने माझ्या पाठीवरील बॅग हिसकावून ते तिघेजण मोटार सायवालवर बसुन पळून गेले त्या बॅग मध्ये कार्यालयाचे १५००० व माझे वयक्तिक १४०० रुपये होते.
त्यानंतर मी त्यांचा पाठलाग करुन त्यांना थोडया अंतरावर अडवले तेव्हा त्या तीन अनोळखी इसमानी मला मारहाण केली .परंतु त्या तीन पैकी दोन इसमांना पकडुन ठेवले व आरडा ओरड केली त्यावेळी हायवेच्या कडेला असलेल्या वस्तीवरील लोक पळत आले व त्या दोन आरोपीना धरून ठेवले परंतु त्यातील एक आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाला होता. या दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुर . नं . ३१३/२०२१ भा . द . वी . कलम ३९४ , ३९७.३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाने कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तपास सुरु केला. त्यात फिर्यादीने व स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे विकी बबनराव लांडगे (रा सौदडे बाबा मंदीर शिरडी), सुदाम साहेबराव काळे (रा . फत्तेपुरा नाका गंगादरवाजा जवळ, ता. येवला)
या पकडलेल्या दोन आरोपीं कडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांने तिसऱ्या साथीदाराचे नाव सागर थाळु साबळे रा हुडको , मनमाड , असे सांगितल्यावर पोलिसांनी सदर आरोपीचा शोध सुरू केला असता सदर आरोपी हा त्याचे राहते घराचे आसपास हुडको परिसर मनमाड येथे असल्याचे गोपनीय बातमी मिळाली
त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जाधव यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड , व पो.कॉ. अनिश शेख यांचे पथकाने सदर ठीकाणी जावुन सापळा रचुन धाडसाने मुत्सदीने , जीवाची बाजी लावुन आरोपीवर झडप घालून त्यास ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने वरील साथीदारा सोबत येसगाव ता कोपरगाव येथे हायवेवर जबरी चोरी केल्याची माहीती दिली.
सदर तिन्ही आरोपीना मा . न्यायालयात हजर केले असता त्यांना मा , न्यायालयाने दि २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत