मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधी बोलायचे सोडून विषयांतर करू पाहणारे महाशय कसे जगता हे जनतेला माहिती-नगराध्यक्ष वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधी बोलायचे सोडून विषयांतर करू पाहणारे महाशय कसे जगता हे जनतेला माहिती-नगराध्यक्ष वहाडणे

  कोपरगाव(वेबटीम)  अफगाणिस्तानातील मुस्लिम भगिनींवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध बोलायचे सोडून-विषयांतर करून कोपरगावातील समस्या मांडून माझ्...

 कोपरगाव(वेबटीम)

 अफगाणिस्तानातील मुस्लिम भगिनींवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध बोलायचे सोडून-विषयांतर करून कोपरगावातील समस्या मांडून माझ्यावर टिका करणाऱ्या बातम्या देणारे महाशय कुणाच्या संपर्क कार्यालयात हेलपाटे मारतात हे जनतेला माहित असून


सर्व  समाजातील सामान्य लोक रात्रंदिवस कष्ट करून पोट भरतात पण काहीजण पाकिटावरच जगतात ते कोण- कोण आहेत हे कोपरगावच्या नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.

यात नगराध्यक्ष वहाडणे यांनी पुढे म्हटले आहे की, या आधी जगात कुठेही मुस्लिमांवर अन्याय झाला,कुणी विटंबना-अवमान केला तर भारतात निषेध व्हायचा. पण  सध्या अफगाणिस्तानात मुस्लिम मुली,महिला भगिनी,बालके यांच्यावर अन्याय- अत्याचार- बलात्कार-हत्त्या होत असूनही कुणीही निषेध-विरोध का करत नाही.टिव्ही वर आपण बघतोय मुस्लिम महिला बालकांचा आक्रोश.हा आक्रोश ऐकूनही सर्व समाजातील,पक्षातील नेते आज का बोलत नाहीत. कि जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालू आहे. आपण आजच सावध झालो नाही तर हे तालिबानी भारतातही घुसून हत्याकांड करून देशातील हिंदू मुस्लिम एकजुटीवर घाला घालू शकतात. हिंदूं महिलांवर  अन्याय झाल्यावर मी बोलायचे व मुस्लिम महिलांवर अन्याय होत असताना बोलायचे नाही हे मला जमणार नाही असे नगराध्यक्ष वहाडणे यांनी सांगितले.




तसेच सर्व पक्ष व नेत्यांनी यावर बोलले पाहिजे यात शंका नाही.मी जे बोलतो ते चुकीच्या प्रवृत्तीविरुद्ध. तोंडावर गोड बोलणारा मी नाही.मागे कोपरगावात मुस्लिम महिलांवर अन्याय झाला तेंव्हा बोलणाराही मीच होतो.कुणी बोलत नाही म्हणून आपणही शांत बसा हे योग्य नाही.देशप्रेमी हिंदू व देशप्रेमी मुस्लिम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.पण गद्दारही अनेक आहेत.त्यामुळेच काश्मीरमध्ये भारतीयांचे बळी जात आहेत असे मत नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत