वसुंधरा'ने घेतलेला वृक्ष संवर्धनाचा वसा प्रेरणादायी - अनुराधा आदिक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वसुंधरा'ने घेतलेला वृक्ष संवर्धनाचा वसा प्रेरणादायी - अनुराधा आदिक

आंबी(संदिप पाळंदे)   "वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असून श्रीरामपूर येथील वृक्षसंवर्धन संवर्धन समितीने घेतलेला हा वसा निश्चितच प्र...

आंबी(संदिप पाळंदे) 

 "वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असून श्रीरामपूर येथील वृक्षसंवर्धन संवर्धन समितीने घेतलेला हा वसा निश्चितच प्रेरणादायी आहे." अशा शब्दात श्रीरामपूर नागरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी वसुंधरा वृक्षसंवर्धन समितीचे कौतुक केले. समितीमार्फत नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते आंबी-अमळनेर स्मशानभूमी व दशक्रिया विधी घाटावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

    आंबीच्या सरपंच संगीताताई बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व अमळनेरच्या सरपंच अरुणाताई भारत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मारुती मंदिराच्या सभागृहात समितीच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी वसुंधरा वृक्षसंवर्धन समितीच्या संस्थापिका निता डंबीर, अध्यक्षा सिमा जाधव, विश्वस्त अर्चना पानसरे, सरोजिनी झरकर, वंदना आदिक, संगीता कासलीवाल या उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात समितीच्या संस्थापिका निता डंबीर म्हणाल्या की, वसुंधरा वृक्षसंवर्धन समिती व श्रीरामपूर नागरपरिषद, आंबी-अमळनेर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आज येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण सर्वांनी वाढदिवसाचा खर्च टाळून झाडे लावली पाहिजे. वड, पिंपळ, कडुलिंब अशा देशी झाडांची जास्तीत जास्त लागवड करून त्यांची काळजी घ्यावी. यापुढे गावोगावी एक तळे आणि एक वन हा उपक्रम राबविणार आहोत. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्यामार्फत पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे यांना या संबंधी पत्र पाठवले आहे. त्यांनाही ही संकल्पना आवडली आहे. यावेळी आंबी-अमळनेर ग्रामपंचायतींच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व वसुंधराच्या कन्यांचा सत्कार केला. 

       कार्यक्रमासाठी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे विलास जाधव, नयन गांधी, श्री. पोळकर, बचत गटाच्या अध्यक्षा मंजुश्री कोळसे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना कोळसे, पोलिस पाटील सुरेश जाधव, माजी सरपंच सतिष जाधव, हरिश्चंद्र साळुंके, कोंडीराम साळुंके, सुनील लोंढे, रोहण जाधव, बाळासाहेब साळुंके, केशव साळुंके, अमळनेरचे उपसरपंच किरण कोळसे, पत्रकार विश्वनाथ जाधव, कृषीमित्र रायभान जाधव, नंदकुमार जाधव, अच्युतराव जाधव, दादासाहेब साळुंके, रमेशकाका जाधव, सेनेचे अमळनेर शाखाध्यक्ष एल. के.साळुंके, आंबीचे विठ्ठल एस. कोळसे, भिम कोळसे, संदिप साळुंके, जालिंदर रोडे, सोमनाथ साळुंके, डॉ. अजय सालबंदे, डॉ. संदिप जाधव, हरिभाऊ साळुंके, प्रशांत चव्हाण, पत्रकार संदिप पाळंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत