गटारी अमावसेच्या दिवशी राहुरी फॅक्टरीत दोन गटात हाणामारी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गटारी अमावसेच्या दिवशी राहुरी फॅक्टरीत दोन गटात हाणामारी

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम: - राहुरी फॅक्टरी येथे गटारी अमावस्या च्या दिवशी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रात्री उशिरा...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथे गटारी अमावस्या च्या दिवशी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.


याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की नगर मनमाड मार्गावरील एका हॉटेलवर  दुपारच्या दरम्यान दोन गटात तुफान हाणामारी झाली होती.मात्र या वादावर पडदा पडला .

त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास कारखाना कॉलनीत असलेल्या एका गटातील तरुणाच्या घरात घुसून दुसऱ्या गटाच्या तरुणांनी  महिलांसह घरातील सर्वाना जोरदार मारहाण करून घरातील सामानांचीही तोडफोड केली.


 यावेळी झालेल्या चकमकित कारखाना कॉलनीत राहणाऱ्या तरुणाच्या घरातील महिला तसेच दोन्ही गटातील तरुण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्या गुन्ह्याची नोंद नव्हती.




दुधाळ साहेब जरा लक्ष घाला.

 

राहुरी फॅक्टरी परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून अवैध व्यवसाय, खासगी सावकारी यावरून शाब्दीक चकमक, हाणामारी आदी घटना नित्याच्या बनल्या आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी  स्वता: लक्ष घालून गुन्हेगारीला आळा बसवबा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत