उंबरे : वेबटीम उंबरे शाळा व्यवस्थापन समिती निवडीत निवडलेले पालक हे गावातील आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत, मात्...
उंबरे : वेबटीम
उंबरे शाळा व्यवस्थापन समिती निवडीत निवडलेले पालक हे गावातील आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत, मात्र, असे लोक जर शाळेत सदस्य म्हणून गेले तर आपले मागचे उद्योग बाहेर येतील, या भीतीने काही 'चपराश्या'ची झोप उडाली आहे. आम्ही सत्याच्या बाजूने लढणारे कडवट शिवसैनिक असून, या समितीमागे वेळप्रसंगी न्यायालयातही भक्कमपणे उभे राहू, अशी भूमिका शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दिपकराव पंडित यांनी मांडली आहे.पंडित म्हणाले, शिवसेनेला काम करण्यासारखे खूप विषय आहेत, त्यामुळे शाळेत राजकारण करण्याची नामुष्की पक्षाच्या नावाखाली कुणी करत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. शिवसैनिक म्हणून आम्ही आशा चुकीच्या गोष्टीला कधीच समर्थन देणार नाही. वास्तविकता, शाळेत राजकारण कोण करतय हे गावाला माहिती आहे. चपराशीपणा करून गावात भांडणे लावले जात आहेत, मामा भाचे याने वाईट केले आहेत, कायम चाटूगिरी करून पोट भरणाऱ्याच्या नादी लागून गावचे वाटोळे झाले आहे, आता ग्रामपंचायतमध्ये तोंड घालता येईना म्हणून, शाळेत राजकारण केले जात आहे.
मात्र, त्याचा हा डाव हाणून पाडू, नवीन सदस्य मंडळ हे स्वच्छ आहे, त्यात कुणावरही गुन्हे दाखल नाहीत, मग, या चपराशीपण करणाऱ्याला हे सदस्य शाळेत का नको आहे, याचा आटापिटा का सुरू आहे,
याचे कोणते उद्योग बाहेर येण्याची याला भीती वाटते, याचा लवकरच आम्ही भांडाफोड करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत