वांबोरी(वेबटीम) वांबोरीकरांच्या महत्त्वाचा प्रश्न असलेल्या वांबोरी- नगर रस्त्याचे मागील दीड महिन्यापूर्वी मोठ्या दिमाखात उद्घाटन करून ...
वांबोरी(वेबटीम)
वांबोरीकरांच्या महत्त्वाचा प्रश्न असलेल्या वांबोरी- नगर रस्त्याचे मागील दीड महिन्यापूर्वी मोठ्या दिमाखात उद्घाटन करून त्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दोन्ही बाजुच्या साईट पट्टी ऊकरल्या त्यामुळे परिसरातील नागरिकांना हायसे वाटले परंतु चार दिवसात हे काम बंद पडले.त्यामुळे या रस्त्याने प्रवास करतांना जिवावरची कसरत करावी लागत असुन यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळते आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा वांबोरीचे माजी उपसरपंच राजेंद्र पटारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसराला जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणारा जवळचा व महत्त्वाचा नगर - वांबोरी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना अनेक वेळा साकडे घातले. हा प्रश्न कायमचा निकाली लागावा यासाठी मागील दीड महिन्यापूर्वी ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भूमिपूजन केले त्यानंतर तात्काळ कामालाही सुरुवात झाली परंतु लगेच कुठेतरी माशी शिंकली व चार ते पाच दिवसातच हे काम बंद पडले त्याला अत्ता सुमारे दीड महिना उलटूनही काम पुन्हा पूर्ववत सुरू झाले नाही.
अर्धवट उकडून पडलेल्या साईट पट्ट्यामुळे वांबोरीसह,कात्रड ,कुक्कडवेढे, उंबरे,ब्राह्मणी ,गुंजाळे, खडांबे, यासह डोंगरगण, गड मांजरसुंभा, पिंपळगाव, आढाववाडी या गावातील नागरिकांना दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेला रस्ता गैरसोयीचा झाला आहे.
संबंधित ठेकेदाराने काम सुरू करतांना रस्ताच्या दोन्ही बाजुच्या साईडपट्ट्यांचे खोलीकरण करून ऊकरून ठेवुन काम अर्ध्यावरच बंद ठेवले आहे.
त्यामुळे अगोदरच वांबोरी- नगर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत त्यात भर म्हणजे उकरून ठेवलेली साईड पट्ट्या यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तर अनेकांना या रस्त्याने प्रवास करताना हाकनाक अपघाताला बळी पडण्याची अनेक उदाहरणे सध्या निदर्शनास येत आहेत. त्यामुळे या रस्त्याने या परिस्थितीमुळे एखादा मोठा अपघात होऊन निरप्राध प्रवासाच्या जीवावर बेतण्याची संभावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी वांबोरीचे माजी उपसरपंच राजेंद्र पटारे यांनी निवेदनातून दिला आहे.
सुरू झालेल्या या रस्त्याचे काम अचानक बंद का? याबाबत सार्वजनिक बांधकाम व ठेकेदार जरी हात वर करत असले तरीही ठेकेदार व वांबोरीतील एका स्थानिक पुढाऱ्यांच्या तडजोडीची बोलणी फिसकटल्यामुळेच रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करून आपला हेतु साधून घेण्यासाठीच रस्त्याचे काम बंद पाडले असल्याचे चर्चा नागरिकांमधुन सुरू असल्याचे राजेंद्र पटारे यांनी यावेळी सांगितले.
रस्ताच्या मुरूमीकरण कामासाठी मुरूमाची रॉयल्टीची परवानगी राहुरी तहसीलदारांकडे मागितली असून परवानगी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम पुन्हा सुरू होईल असे सागर कोतकर (सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर) यांनी सांगितले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत