कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पालिकेला बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर ध...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पालिकेला बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर धुळे महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त असलेले शांताराम गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. याबाबत नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी बुधवारी (ता.11) आदेश काढले आहेत. त्यानुसार गुरुवारी नूतन मुख्याधिकारी गोसावी यांनी पदभार स्वीकारला आहे.
अमळनेर पालिकेला बदलून गेलेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी उत्तम समन्वय साधून शहरचा विकास केला आहे. यामध्ये स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबवून पालिकेला अग्रस्थान मिळवून दिले होते. याचबरोबर कोविड महामारी, रस्ते, गटार, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न हाताळून तडीस नेले. त्यामुळे नूतन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनाही आपल्यातील चपखलपणा दाखवून पदाधिकार्यांसह शरहवासियांच्या मनावर छाप पाडावी लागणार आहे. पालिकेच्या सर्व विभागांना भेटी देत कोविडच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, मुलभूत प्रश्न सोडविणे आणि शहराचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, बांधकाम विभागाचे अभियंता दिगंबर वाघ यांसह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत