कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिकेचा यशस्वीरित्या कारभार करून शहरवासियांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले मुख्याधिकरी प्रशांत सरोदे यांची जळग...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिकेचा यशस्वीरित्या कारभार करून शहरवासियांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले मुख्याधिकरी प्रशांत सरोदे यांची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पालिकेला बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर धुळे महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त असलेले शांताराम गोसावी यांची नियुक्ती झाली आहे.
याबाबत नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी बुधवारी (ता.११) आदेश काढले आहेत. त्यामुळे नूतन मुख्याधिकारी गोसावी यांना स्थानिक राजकारण सांभाळून शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे कसब दाखवावे लागणार आहे.
अमळनेर पालिकेला बदलून गेलेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी उत्तम समन्वय साधून शहरचा विकास केला आहे. यामध्ये स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबवून पालिकेला अग्रस्थान मिळवून दिले होते.
याचबरोबर कोविड महामारी, रस्ते, गटार, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न हाताळून तडीस नेला. त्यामुळे मुख्याधिकारी सरोदे यांनी सत्ताधारी व विरोधकांसह नागरिकांच्या मनात उत्तम प्रशासक म्हणून स्थान निर्माण केलं होतं. त्यानुसारच नूतन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना नियोजन करून कामाचे कसब दाखवावे लागणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत