४ वाजेनंतर छोट्या व्यावसायिकांना पार्सल सुविधेस परवानगी द्या, राहुरीत मनसे विद्यार्थी सेनेची नायब तहसीलदारांकडे मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

४ वाजेनंतर छोट्या व्यावसायिकांना पार्सल सुविधेस परवानगी द्या, राहुरीत मनसे विद्यार्थी सेनेची नायब तहसीलदारांकडे मागणी

  राहुरी प्रतिनीधी राहुरी फॅक्टरी परिसरातील छोट्या व्यावसायिकांना सायंकाळी ४ वाजेनंतर पार्सल सुविधेस परवानगी द्यावी अशा मागणी महाराष्ट्र नवन...

 राहुरी प्रतिनीधी

राहुरी फॅक्टरी परिसरातील छोट्या व्यावसायिकांना सायंकाळी ४ वाजेनंतर पार्सल सुविधेस परवानगी द्यावी अशा मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने आज बुधवारी नायब तहसीलदार श्रीमती.पी.एस.दंडिले यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले की, राहुरी फॅक्टरी परिसरातील चहा, वडापाव पावभाजी, जिलबी व इतर खाद्य पदार्थ विक्रते यांना दुपारी वाजेनंतर ग्राहकांची मागणी असते. त्यामुळे या सर्वांना ४ वाजेनंतर पार्सल सुविधेस परवानगी मिळावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने करण्यात आली.

यावेळी मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष संदेश पाटोळे, वैभव गाडे, नरेश गोरे, साहिल पठाण, तुषार राऊत यांसह आदिं छोटे व्यावसायिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत