स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी शरद खांदे यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी शरद खांदे यांची निवड

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम: स्वाभिमानी मराठा महासंघाची वाटचाल राज्यामध्ये अतिशय अग्रेसर पणे सुरू आहे मराठा समाजाचे प्रश्न हाती घेऊन समाजाला न्य...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:


स्वाभिमानी मराठा महासंघाची वाटचाल राज्यामध्ये अतिशय अग्रेसर पणे सुरू आहे मराठा समाजाचे प्रश्न हाती घेऊन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय भूमिकेतून स्वाभिमानी मराठा महासंघाची स्थापना संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी केली आहे.अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानी मराठा महासंघ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही प्राथमिक भूमिका संघटनेची आहे. याच पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात काम वाढवण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथील शरद खांदे यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे व प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे यांनी नियुक्तीपत्र नुकतीच दिलेय.


या निवडी प्रसंगी शरद खांदे यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आहेत आणि मराठा समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा राज्यांमध्ये काम सुरू आहे मात्र स्वाभिमानी मराठा महासंघ राजकीय भूमिकेतून कुठल्याही पक्षातील मराठ्यांना एकत्र करण्याचे काम करत असल्यामुळे राहुरी तालुक्‍यात संघटना वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील असे शरद खांदे यांनी मत व्यक्त केले.



शरद खांदे यांचे निवडीचे स्वागत स्वाभिमानी मराठा महासंघाचे मार्गदर्शक शिवशाहीर कल्याण काळे  युवक प्रदेशाध्यक्ष विनोद वहाडणे,  शिवभक्त चंद्रकांत लबडे ,महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना धुळे ,प्रवक्ते विक्रमादित्य मोरे  ,अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड ,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषाताई निमसे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन लिपणे युवती जिल्हाध्यक्ष संस्कृती गुंजाळ युवती राहुरी तालुका अध्यक्ष शिवव्याख्याते प्रतिक्षा घाडगे तसेच  नाशिक म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे,चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे, माजी नगरसेवक नाना बर्डे,उदय पटारे, सागर खांदे, टिपू शेख आदींनी निवडीचे स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत