देवळाली प्रवरा (प्रतिनिधी):- देवळाली प्रवरा शहरातील नगरपरिषद लगतच्या झोपडपट्टी वासियांचा घरकुलाचा प्रश्न नगरपरिषद स्थापनेपासून प्रलंबित होता...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी):-
देवळाली प्रवरा शहरातील नगरपरिषद लगतच्या झोपडपट्टी वासियांचा घरकुलाचा प्रश्न नगरपरिषद स्थापनेपासून प्रलंबित होता. माझा झोपडपट्टी वासियांना शब्द होता की, झोपडपट्टीमधील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार त्यानुसार मी नगराध्यक्ष झाल्यापासुन यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील होतो. यामध्ये जागेची अडचण होती परंतू त्यांना आहे त्याच जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देणार असल्याचे नगराध्यक्ष कदम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निकत साहेब म्हणाले की, ही घरकुल योजना कशी बसवता येईल व आज तुमचे सध्याचे असलेले घराची जागा व यामध्ये अधिक वाढीव जागा कशी मिळू शकेल यासाठी मी प्रस्ताव, आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिलेले आहेत यासाठी तुमची साथ महत्वाची आहे व हा प्रकल्प उभारणी होईपर्यंत संयम बाळगा याचा निश्चीतच फायदा होवून प्रत्येक लाभार्थ्याला हक्काचे घर मिळेल.
यावेळी प्रास्ताविकामध्ये शेतमजूर संघटनेचे नेते कॉम्रेड शरद संसारे म्हणाले की, या झोपडपट्टी वासियांचा घरकुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षपासून प्रलंबित आहे. अनेक सत्ता आल्या गेल्या परंतु नगरपरिषदेच्या भिंतीला लागून असलेल्या झोपडपट्टी वासियांना सर्वांनी दुर्लक्षित केले व यातून मार्ग निघू शकला नाही. पिढ्यानपिढ्या हे कुटुंब याठिकाणी राह्त असल्याने त्यांचा इतर ठिकाणी जावून राहण्यास विरोध होत. यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी मी व माझे सहकारी अनेक वेळा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना भेटलो.
नगराध्यक्ष यांनी निवडून आल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये शब्द दिला की, तुम्ही सर्व लाभार्थ्यांना तयार करा व याबाबत मी मुख्याधिकारी व नगर बांधकाम अभियंता यांच्याशी चर्चा करून मार्ग काढतो त्यानुसार त्यांनी सर्व झोपडपट्टीतील पात्र लाभार्थ्यांचे अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून ही योजना व या झोपडपट्टी वासियांना न्याय मिळेल यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. मी सर्व लाभार्थ्यांच्या वतीने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो असे कॉम्रेड शरद संसारे म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड मदिना शेख यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या की, नगराध्यक्ष यांनी मांडलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही या भागाला सर्वानुमते सावित्रीबाई फुले नगर हे नाव देत आहोत. यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून याचे स्वागत केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत