कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या सत्य शोधक अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याच्या उदघाटनास परवानगी मिळा...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या सत्य शोधक अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याच्या उदघाटनास परवानगी मिळावी, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव पालिकेच्या वतीने कोपरगाव शहरात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव झालेला असून त्याप्रमाणे सर्वच शासकीय अटी शर्थीचे पालन करून पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झालेले आहे.
दि १ ऑगस्ट २०२१ रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून सदर पूर्णाकृती पुतळा कोपरगाव शहरात आणून नियोजित जागेवर स्थानापन्न करण्यात येणार होता मात्र साथीच्या आजाराचा फैलाव व वाढती रुग्ण संख्या पहाता या कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
सद्या शासनामार्फत लॉक डाऊनचे बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे १०१ जयंती वर्षाचे औचित्य साधून व समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन शासकीय नियमांच्या अटी व शर्थीचे पालन करण्याच्या अटीवर सत्य शोधक अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उदघाटन करण्यास परवानगी मिळावी ही असे या निवेदनात म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत