त्या २८ कामाबाबत चर्चेअंती उभयतामध्ये समझोता, औरंगाबाद खंडपिठातील याचिका मागे-संधान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

त्या २८ कामाबाबत चर्चेअंती उभयतामध्ये समझोता, औरंगाबाद खंडपिठातील याचिका मागे-संधान

कोपरगाव :- प्रतिनिधी     कोपरगांव नगरपालिकेत  जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली भाजपा सेना, आरपीआय, गटनेत्यांसह नगर...

कोपरगाव :- प्रतिनिधी


    कोपरगांव नगरपालिकेत  जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली भाजपा सेना, आरपीआय, गटनेत्यांसह नगरसेवकांचा विकास कामांना सतत पाठींबा असुन त्या २८ कामाबाबत औरंगाबाद खंडपिठात दाखल करण्यांत आलेली याचिका क्रमांक ६८९६/२०२१ बाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे व उभयतामध्ये चर्चेअंती तडजोड होवुन ही सर्व कामे दर्जेदार होण्याबाबत समझोता झाल्याने शुक्रवारी मागे घेण्यांत आल्याची माहिती अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी दिली. 



ते म्हणाले की, कोपरगांव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पालिका सभागृहात प्रत्येक बैठकीत विकासात्मक विषयांना पाठींबा देवुन आवश्यक त्या मंजु-या भाजपा, सेना, रिपाई नगरसेवकांकडून यापुर्वीच देत आलेलो असुन त्या २८ कामातील २२ कामांना विरोध नव्हता फक्त ६ कामांच्या तांत्रिक अडचणी बाबत न्यायालयात तकार करण्यांत आली होती, मात्र नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहर विकासासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे म्हणून भूमिका मांडली त्याला पाठींबा देत या कामाबाबत उभयपक्षी चर्चा होवुन समझोता झालेला आहे त्यामुळे औरंगाबाद खंडपिठात आमच्यावतींने दाखल करण्यांत आलेली याचिका शुक्रवारी मागे घेवुन ही सर्व विकासकामे तात्काळ व दर्जेदार होण्यांसाठी गटनेत्यासह भाजपा, सेना, आरपीआयचे नगरसेवक जाणिवपुर्वक प्रयत्न करतील असे पराग संधान शेवटी म्हणाले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत