श्रीरामपूर(वेबटीम):- श्रीरामपूर नगरपरिषदेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीरामपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. ...
श्रीरामपूर(वेबटीम):-
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीरामपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. दिलीप भाऊसाहेब शिरसाठ यांना ' श्रीरामपूर भूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कोविड काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते डॉ.शिरसाठ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी गणेश शिंदे आदिंसह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.
डॉ.दिलीप शिरसाठ यांनी कोरोना काळात पोलिस बांधवांना जेवणाचे डबे पुरविणे, सॅनेटायझर- मास्क वाटप करणे, अल्प दरात कोरोना रुग्णांना बरे करून कमी दरात एचआरसिटी स्कॅन, रक्ताच्या तपासण्या आदी सेवा दिल्या. डॉ.शिरसाठ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना श्रीरामपूर भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत