गुणवंतांच्या पाठीशी बिपीनदादा कोल्हेंचे पाठबळ-शेटे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुणवंतांच्या पाठीशी बिपीनदादा कोल्हेंचे पाठबळ-शेटे

  कोपरगाव :- प्रतिनिधी    संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे नेहमीच गुणवंतांना प्रेरणा देवुन त्यांच्यातील आत्मविश्वास व...

 कोपरगाव :- प्रतिनिधी

  

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे नेहमीच गुणवंतांना प्रेरणा देवुन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवुन पाठबळ देण्यांत पुढाकार घेत असतात असे प्रतिपादन अध्यक्ष बाळासाहेब शेटे यांनी केले. 



        

  येथील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढी सभासदांच्या ६४ मुलांनी इयत्ता दहावी बारावी मध्ये विशेष प्राविण्य गुणवत्ता मिळविल्याबददल त्यांचा कोरोना नियम पाळत रोख बक्षिस पारितोषकासह सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. ५७ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत प्रारंभी उपाध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, रासायनिक विभागाचे व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, हेड ग्रुप एच. आर पी. जी. गुरव, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, संचालक आर. एस. लोंढे, यु. पी. आहेर, ए. एस. नाईकवाडे, आर. एम. डमाळे, डी. बी. केकाण, तज्ञ संचालक एस बी जाधव, निमंत्रीत संचालक बी. ए. कदम आदि उपस्थित होते. 




          श्री. बाळासाहेब शेटे पुढे म्हणाले की, ग्रामिण भागातील मुला मुलींना बालवाडी पासुन ते पी एच डी पर्यंत दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व दालने खुली केली आहेत. शिक्षणातुन कुटूंबाचा उध्दार करण्यात त्यांनी आधूनिक सहकारमहर्षिसह कर्मवीरांची भूमिका बजावली आहे. त्यांचे नातु व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे देखील त्याच तळमळीने मुलांनी शिकुन जीवनांत प्रगती करावी म्हणून सातत्याने लक्ष देत असतात. दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना हे प्रोत्साहन असुन त्यांनी जीवनांत स्वतःबरोबरच गावचे व संस्थेचे नांव मोठे करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे ते शेवटी म्हणाले. सुत्रसंचलन संचालक चंद्रकांत जाधव यांनी केले तर व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत