देवळाली प्रवरा(वेबटीम):- “ सेवानिवृत्ती नंतर मिळालेल्या उपदानाच्या रक्कमेचा विनियोग कुटुंबियांच्या उत्कर्षा करिता करावा,” असे आवाहन द...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या सभाग्रहात नगरपरिषदेची ऑनलाईन सभा पार पडली,सभा संपल्या नंतर पाच सेवानिवृत्त कर्मचा-यांना उपदानाच्या रक्कमेचे वाटप करण्यात आले,त्यावेळी मुख्याधिकारी अजित निकत,प्रशासकीय अधिकारी बन्सी वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे म्हणाले कि, “नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना चांगल्या सेवासुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात,जे कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतात त्यांना सेवानिवृत्ती नंतर लगेच आर्थिक लाभ दिले जातात”
सेवानिवृत्त कर्मचारी कानिफनाथ जाधव,दत्तात्रय होले,मुकुंद ढूस,शंकर पठारे,जालिंदर गोरे,स्व.सुरेश वाळूंज या कर्मचा-यांना उपदानाची रक्कम 26 लाख 72 हजार 250 रुपये रक्कमेचे वाटप करण्यात आले.
यावेळी लेखाधिकारी कपिल भावसार,कर निरीक्षक मनोज पापडीवाल,स्थापत्य अभियंता एस.के..मोटे,सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी,सुरेश चासकर,सूर्यभान गडाख,संतोष गाडेकर,सभालिपिक राजेंद्र हारगुडे, अजय कासार आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत