पानेगावात महादेव देवस्थान ट्रस्टच्या सचिवांसह दोघांवर प्राणघातक हल्ला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पानेगावात महादेव देवस्थान ट्रस्टच्या सचिवांसह दोघांवर प्राणघातक हल्ला

  नगर प्रतिनिधी:- नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले खजिनदार जनार्दन गागरे यांच्या सह अशोक उत्तम जं...

 नगर प्रतिनिधी:-


नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले खजिनदार जनार्दन गागरे यांच्या सह अशोक उत्तम जंगले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.



 महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले खजिनदार जनार्दन गागरे यांच्या सह अशोक उत्तम जंगले हे दि.२३ रोजी रात्री ८:३० दरम्यान महादेव देवस्थान सभागृहात पाऊसामुळे बसले असता दोन वर्षापासून गावात नसलेला साहेबराव काशिनाथ वाघमारे याने अचानक येवून हातात आसलेल्या  लोखंडी रॉड च्या साह्हाय्याने खाली बसलेले सुरुवातीला किशोर जंगले यांच्या डोक्यात लोखंडी रॉड  घालून हल्ला केला  तसेच जवळच असलेले जनार्दन गागरे, अशोक उत्तम जंगले यांना हि लोखंडी रॉडच्या साह्हाय्याने हल्ला केला. अचानक झालेला ह्या सर्व प्रकारामुळे क्षणभर काहीच कळायला मार्ग नव्हता. यावेळी हल्लेखोर साहेबराव काशिनाथ वाघमारे याने किशोर जंगले  यांना संबोधून म्हणाला गावचा दादा झाला का? मंदिर का तुमच्या बापाचे आहे का? मंदिरा जवळ सुरू असणारे झुगार ,मटका, वाळू बंद करतो तसेच येथे दारुंड्याना येथे थांबवू देत नाही. सार गांव तुझ्या बापाचे झालं का? येथे बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तु चालू करतो ह्या सर्वांन मागे तुच मोहरक्या आहे. सांग माझी म्हतारी तुला काय म्हणाली. तु आणि पाटलामुळे माझे आई-वडील, भाऊ वाचलेले असून आता मी तुझीच गेम करणार आहे. सोबत असलेले उर्वरित तिघांनी प्रतिकार करुन पुढील लोखंडी रॉडचे  होणारे वार अंगावर झेलून अशोक जंगले, जनार्दन गागरे  अजय नाईकवाडे, वार अंगावर झेलले. हे तिघे आपल्याला हाणमार करतील या भितीने साहेबराव काशिनाथ वाघमारे पसार झाला.

प्राथमिक उपचारासाठी मांजरी येथे ओम हाॅस्पिटल नेवून डोक्याला गंभीर मार लागल्याने १२ टाके तसेच हाताला व पायाला प्लास्टर करुन पुढे रात्री १:३० वा. नगर येथील मॅट्रिक्स हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू आहे. किशोर जंगले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याने गावात मोठे दहशतीचे वातावरण पसरले होते. 

 


 महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले यांच्या वर झालेल्या प्राणघातक हल्याचा जाहिर निषेध करत असून तातडीने संबंधित साहेबराव काशिनाथ वाघमारे तसेच ह्या घटनेमागे कोणी मास्टरमाईंड आहे का याचा शोध लावून पोलीसांनी तातडीने पुढील कारवाई करावी अन्यथा गांव बंद आंदोलन करू. 

    संजय जंगले, सरपंच  

 दत्तात्रय घोलप, तंटामुक्ती अध्यक्ष 



महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याची माहिती पोलीस पाटील यांनी दिली रात्रीच तातडीने पोलीस फौजफाटा पाठवून हल्लेखोर आरोपी साहेबराव काशिनाथ वाघमारे याला ताब्यात घेतले. असून यातील मास्टर माईंड कोणी आहे का याबाबत तपास करणार असल्याचे सांगून अगोदर गंभीर जखमी असणारे किशोर जंगले यांना उपचारासाठी हाॅस्पिटल येथे दाखल करून पुढील गुन्हा दाखल करण्यात येईल असे रामचंद्र कर्पे सपोनि सोनई पोलीस स्टेशन यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत