राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील एका ठेकेदाराने खासगी सावकाराच्या जासास कंटाळून जीवनयात्रा संपवण्याच्या प्रयत्न गुरुवारी...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील एका ठेकेदाराने खासगी सावकाराच्या जासास कंटाळून जीवनयात्रा संपवण्याच्या प्रयत्न गुरुवारी दुपारी करण्यात आला. सदर ठेकदारावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे.देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यातील पोलीसांनी वृत्तास दुजोरा दिला असुन अद्याप आमच्याकडे कोणतीही फिर्याद दाखल झाली नाही.
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील एका ठेकेदाराने सावकारांकडून व्याजाने कन्स्ट्रक्शनच्या उद्योग व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते. लसावकारांना घेतलेल्या कर्जापेक्षा चार पट व्याज वसुल केले आहे. काही प्रमाणात मुद्दल हि मागे देण्यात आली असली तरीही सावकारांचा व्याजाच्या पैशासाठी तगादा चालूच असल्याने सावकाराच्या जासास कंटाळून कन्स्ट्रक्शन मधील एका ठेकेदाराने गुरुवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. देवळाली प्रवरा येथील व उंबरे येथील हे खासगी सावकार असल्याचे चर्चेतून समजते.
ठेकेदाराने गळफास घेतल्या नंतर लगेचच कुटूंबाच्या लक्षात आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला.गळ्यातील गळफास काढून स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी बोलवण्यात आले होते.स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून नगर येथे हलवण्याचा सल्ला दिला.या ठेकेदारावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून वैद्यकीय सूत्रांनी मात्र रुग्णाच्या परिस्थिती बाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
खासगी सावकाराच्या जासास कंटाळून अनेकांनी आपली जिवनयात्रा संपवली तर काहींनी गाव सोडून जाऊन सावकाराच्या जाचातुन मुक्त होण्याचा प्रयत्न केला.
खासगी सावकाराच्या जासास कंटाळून अनेकांनी आपली जिवनयात्रा संपवली तर काहींनी गाव सोडून जाऊन सावकाराच्या जाचातुन मुक्त होण्याचा प्रयत्न केला.
आज पुन्हा सावकाराच्या जाचास कंटाळून कन्स्ट्रक्शन मधील तरुण ठेकेदाराने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.खासगी सावकारांचे हितसंबंध पोलीस प्रशासनाशी सलोख्याचे असल्याने तक्रार करूनही खासगी सावकाराविरुद्ध कारवाही होत नाही.त्यामुळे खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करण्याचे प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सावकाराविरुद्ध महसुल, दुय्यय निबंधक,पोलीस प्रशासन कारवाई करतील का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत