कोपरगाव/वेबटीम:- महाराष्ट्रात जातीय अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली असून अन्याय अत्याचार प्रकरणात कायदेविषयक मदतीसाठी वकिलांचे संघटन उभारणार अ...
कोपरगाव/वेबटीम:-
महाराष्ट्रात जातीय अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली असून अन्याय अत्याचार प्रकरणात कायदेविषयक मदतीसाठी वकिलांचे संघटन उभारणार अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जातीय अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली या दुर्दैवाने सर्वाधिक अत्याचार मातंग समाजावर होत असून पीडित कुटुंबाला योग्य वेळी कायदेशीर मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे अनेक पीडितांना न्याय मिळत नाही तसेच या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना,नेते व कार्यकर्ते प्रयत्नशील असतात मात्र त्यातून देखील योग्य कायदेशीर मदत मिळत नाही अत्याचार ग्रस्त कुटुंबियांना गुन्हा दाखल होऊ नये म्हणून गावातील राजकीय लोकांकडून दबाव टाकला जातो तर पोलीस तपासा मध्ये कायदेशीर गुंतागुंत लक्षात येत नसल्याने पुढे चालून कोर्टातून अनेक आरोपी निर्दोष सुटतात तसेच एखाद्या प्रकरणात अन्याय होऊन देखील संबधीत पीडितांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते त्यामुळे गाव पातळीवर अन्याय होऊन देखील प्रशासनाच्या हलगर्जी पणा मुळे व राजकीय दबावामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही स्थानिक पातळीवर नेते संघटना पाठीशी उभ्या राहतात मात्र त्या नंतर संबंधित पीडितांना न्यायाकरिता पोलीस स्टेशन व कोर्टाचे उंबरे झिजवावे वाहतात एवढे करून देखील पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही.
मागील काही दिवसांपासून मातंग समाजावरील वाढते अन्याय अत्याचार तसेच या अत्याचारावर आवाज उठवणारे सामाजिक नेते व कार्यकर्ते यांना लक्ष करून कायदेशीर अडचणी निर्माण केल्या जात असल्याचे दिसून येते त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुक्या पातळीवर या अन्याय ग्रस्त पीडित कुटुंबाला कायदेशीर मदत व्हावी म्हणून वकिलांचे संघटन उभे करणार असून त्या बाबत समाजातील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या वकिलांनी एकत्र येऊन समाजावरील अन्याय अत्याचार प्रकरणात निस्वार्थ भावनेने पुढे यावे असे आवाहन केले असून काम करू इच्छिणाऱ्या वकील बांधवांनी अँड.नितीन पोळ 9860733420 व 9175894420 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत