राहुरी(वेबटीम):- नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी कॉलेज परिसरातील हॉटेल साई दर्शन समोर झालेल्या अपघाता जखमी झालेले सायकलस्वार गोरक्षनाथ तारडे...
राहुरी(वेबटीम):-
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी कॉलेज परिसरातील हॉटेल साई दर्शन समोर झालेल्या अपघाता जखमी झालेले सायकलस्वार गोरक्षनाथ तारडे(रा.राहुरी फॅक्टरी) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
आज दुपारी नगर-मनमाड मार्गावर दुचाकीवरून राहुरीकडे जात असलेला मंगेश राठोड(रा.चिंचविहिरे) व सायकल वर असलेले गोरक्षनाथ तारडे(रा.राहुरी फॅक्टरी) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोघे गँभीर जखमी झाले असता प्रथम त्यांना प्राथमिक उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त् दोघांना जबर मार लागल्याने यातील गोरखनाथ तारडे यांना संगमनेरकडे उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यामध्ये तारडे यांचा मृत्यू झाला आहे.
तारडे हे धार्मिक वृत्तीचे होते.फॅक्टरी परिसरात महाराज नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याच अपघातातील जखमी दुचाकीस्वार मंगेश राठोड(रा.चिंचविहिरे) याच्यावर नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत