कोपरगांव/वेबटीम:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत इन्फोसिस या...
कोपरगांव/वेबटीम:-
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत इन्फोसिस या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या १६ विध्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली असुन या विध्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात कंपनीने रू ३. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनीच्या प्रयत्नातुन विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत असलेले विद्यार्थी बहुतांशी ग्रामिण भागातील आहे. सध्याच्या करोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील अर्थकारण कोलमडले असुन यात ग्रामिण भागाला मोठा फटका बसला आहे. अशा परीस्थितीत संजीवनीने अधिक नेटाने काम करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या कशा देता येईल यावर लक्ष केंद्रीत केले
आणि यातुन मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहे. इन्फोसिस या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद राजेंद्र सोनवणे, आरती बाळासाहेब जाधव, सचिन भिमराज घुगरे, जयेश बाबासाहेब सैंदाने, पियुष माधवराव अवचर, श्रध्दा प्रकाश शिरोदे , महेश सुखदेव वानखेडकर, ऋतुजा तुकाराम पानगव्हाणे, प्राची राजाराम झावरे, प्रतिक रमेश चौधरी , सिध्देश संजय सदाफळ, प्रशांत तुकाराम खंगल, सुरेखा यशवंतराव पवार, प्रिती विजयराव परजणे, किरण सुरेश मिटके व अंजली प्रताप जाधव यांचा समावेश आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत