नेवासे प्रतिनिधी-: अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे यांचा जिल्ह्यातील पाच वर्...
नेवासे प्रतिनिधी-:
अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे यांचा जिल्ह्यातील पाच वर्षोचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करून जळगाव जिल्ह्यात बदली झाली असून नेवासे पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित निरोप समारंभात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार बोलत होते.
पोवार पुढे म्हणाले की,शेवाळे यांनी जिल्ह्यात नगर एम आय डी सी, संगमनेर तालुका, पाथर्डी, श्रीरामपूर शहर, नेवासे येथे संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पावन भूमीत काम करण्याचं भाग्य लाभलं असून नेहमीच पोलीस दलात अभिप्रेत असे काम केले. जनतेची, कर्मचाऱ्यांशी असलेला सुसंवाद, कार्यक्षेत्रातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांनी खमकी भुमिका घेतली. त्यांचा कडे माणसं ओळखण्याची चांगली क्षमता असून ते जळगाव जिल्ह्यात यशस्वीपणे काम करुन नक्कीच अहमदनगर जिल्ह्यात बढतीवर येतील अशा शुभेच्छा व्यक्त पोवार यांनी केल्या.
सत्काराला उत्तर देताना शेवाळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात काम करत आसताना नेहमीच जबाबदारी असते परंतु सर्वांचे सहकार्य लाभले जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, शेवगाव उप विभागीय पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे तसेच जिल्ह्यातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले नक्कीच बढतीवर जिल्ह्यात पुन्हा सेवेसाठी येवू अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सपोनि विजय ठाकुर,उपनिरीक्षक भाटेवाल, धनंजय पाटील,जरे,ससाणे,गिते,साळवे, गायकवाड,भागवत शिंदे, राजपूत, इनामदार, आव्हाड,मरकड,जाधव, पवार घुनावंत महिला कर्मचारी उंदरे,धाने,गावडे आदी सह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत