कोपरगाव(वेबटीम):- मुंबई -नागपुर या संमृद्धी महामार्गाच्या चांदेकसारे येथील कामाचा ठेका घेतलेल्या गायत्री कंपनी च्या मनमानी कारभारामुळे शेत...
कोपरगाव(वेबटीम):-
मुंबई -नागपुर या संमृद्धी महामार्गाच्या चांदेकसारे येथील कामाचा ठेका घेतलेल्या गायत्री कंपनी च्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे संसार पाण्यात गेले असुन त्यामुळे झालेल्याआर्थिक नुकसानीस गायत्री कंपनी जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.मागील दोन -तिन वर्षांपासून समुध्दी महामार्गाचे सुरू आहे. त्यासाठी सरकार ने वेगवेगळ्या कंपन्यांना ठेके दिले आहेत चांदेकसारे येथील कामाचा ठेका गायत्री कंपनी मिळाला त्या साठी त्यांनी शेतकर्याकडून शेतजमीन विकत घेऊन त्यात उत्खनन सुरू केले आहे व काही ठिकाणी खडी क्रेशर सुरू केले आहे.त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.
चांदेकसारे हद्दीत सर्वे नंबर १४६ मध्ये तब्बल ६एकरात दगड उत्खनन सुरू आहे. तसेच खडी क्रेशर मुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होत आहे त्यामुळे शेजारच्या शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे तसेच होणाऱ्या उत्खननामुळे सर्वे नंबर १४६ मधील शेतकऱ्याच्या पक्के बांधकाम असलेले घराला तडे गेल्याने पावसाचे पाणी घरात येत आहे.
तसेच या भागात पाटबंधारे विभागातुन आवर्तन येत होते परंतु या उत्खननामुळे चारीस तडे गेले आहे त्यामुळे शेतकरी आवर्तना पासुन वंचित राहिल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.त्या बरोबर शेजारील शेतातील विहीरींनी तळ गाठला आहे अशी माहीती शेतकरी अशोक होन यांनी सांगितले आहे
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानावर गोष्ट घातली असुन वेळोवेळी अधिकार्यांना समक्ष जाऊन निवेदन देखील दिले आहे. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.आहे सदर बाधीत शेतकऱ्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नाही.शेतकरी तिव्र झाला असुन सर्व बाधित शेतकर्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मौजे चांदेकसारे येथील बाधित शेतकर्यांमध्ये श्री. पोपट भानुदास होन सर्वे नंबर १४६/१/१ , श्री.दिपक सिताराम होन १४६/१/३, श्री शांतीलाल सिताराम होन १४६/१/२, किशोर पोपट होन १४६/१/१/१,अशोक पोपट होन १४६/१/१/२ यांची नुकसान होत आहे श्री अशोक होन यांनी सांगितले की , आमच्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही गेट बंद करून कायदेशीर कारवाई करू असे सांगितले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत