कोपरगाव/प्रतिनिधी:- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलत...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. हि समाधानाची बाब असली तरी आरोग्य विभागाकडून तिसरी लाट येण्याचे संकेत दिले असल्यामुळे परिस्थिती काहीशी चिंता वाढवणारी आहे. श्रावण महिन्यात येणारे सण व या सणाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळल्यास आपण निश्चितपणे थोपवू शकतो. त्यासाठी आपल्याला भावनांना आदर घालून येणारा गणेशोत्सव साजरा करतांना मागील वर्षीप्रमाणे ‘एक गाव, एक गणपती’ या पद्धतीने साजरा करून शासनाने कोरोनाचा पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती केली. सदर विनंतीला प्रतिसाद देत वेळापूर, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगाव थडीच्या सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटलांनी ‘एक गाव, एक गणपती’ बसविणार असल्याचे सांगून नियमित करण्यात येणारी आरती व पूजाअर्चा एकूण पाच व्यक्तींच्या उपस्थितीत करून मिरवणूक देखील काढणार नसल्याचे सांगितले.
तसेच शहाजापूर, मढी बु., मढी खु., हंडेवाडी, मंजूर या गावातील सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी फक्त घरातच श्री गणेशाची स्थापना करून सार्वजनिक ठिकाणी श्री गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे यावेळी सांगितले.
याप्रसंगी पोलीस हे.कॉ.अमर गवसणे, पोलीस नाईक युवराज खुळे, कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे, सुरेगावचे उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, सदस्य सुनील कोळपे, मढी खु.चे सरपंच प्रविण निंबाळकर, कोळगाव थडीचे सरपंच सौ.मीनल गवळी, माहेगाव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, वेळापूरच्या सरपंच सौ.वैशाली भोसले, उपसरपंच बापू बोरावके, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष संजय वाबळे, तालुकाध्यक्ष इंद्रभान ढोमसे, मंजूरचे पोलीस पाटील श्रीराम राजेभोसले, कोळगाव थडीच्या पोलीस पाटील सौ.कांचन राऊत, अंबादास धनगर तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत