राहुरी प्रतिनिधी राहुरी येथे मराठा बहुउद्देशीय संस्था कार्यालयात मराठा आरक्षणाचे प्रणेते व माथाडी कामगारांचे दैवत कै.आमदार अण्णासाहेब प...
राहुरी प्रतिनिधी
राहुरी येथे मराठा बहुउद्देशीय संस्था कार्यालयात मराठा आरक्षणाचे प्रणेते व माथाडी कामगारांचे दैवत कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.कोरोंना रोगाच्या प्रादुर्भावमुळे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आला नाही.
राहुरी शहरातील नंदू शिरसाठ या तरुणाचा मागील महिन्यात अपघात झाला होता.अपघाता मध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या होत्या.शस्त्रक्रिया करण्यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटल नगर येथे दाखल करण्यात आले आहे.घरची परिस्थिती बेताचीच असल्याने हॉस्पिटल खर्च करणे देखील मुश्किल झाले.घरा मध्ये पत्नी व चिमुकले...... मोलमजुरी करून घरखर्च भागवायचा.... त्यात घरातील कर्तापुरुष दवाखान्यात झोपून ..नातेवाईक,मित्र यांनी शक्य होईल ती मदत केली परंतु दवाखान्याचा खर्च काय मिटेना.
अशा या कुटुंबाच्या मदतीसाठी कै.आमदर अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीला होणारा खर्च टाळून नंदू शिरसाठ या तरुणाच्या पुढील उपचारासाठी पत्नी सौ.पुजा नंदु शिरसाठ यांचाकडे हॉस्पिटलचा नावे धनादेश देण्यात आला आहे.
या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे,मराठा उद्योजक लोबीचे राहुरी ता.अध्यक्ष अक्षय कैलास तनपुरे,राजेंद्र लबडे,मनोज शिरसाठ,आदेश जाधव,अविनाश क्षीरसागर,महेंद्र शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी नंदू शिरसाठ या युवकाला समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे अवाहन मराठा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. आर्थिक मदत करण्यासाठी ९०७५०१९५४५ (सचिन बाबासाहेब नळे) या क्रमांकावर फोनपे अथवा गुगल पे करावे असे अवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत