लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या गणपती मूर्ती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या गणपती मूर्ती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव/प्रतिनिधी:- लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने समता स्कूल येथे शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याची कार...

कोपरगाव/प्रतिनिधी:-

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने समता स्कूल येथे शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा मंगळवारी (ता.७) आयोजित करण्यात आली होती. यास शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.






या कार्यशाळेत इयत्ता सातवी ते नववीच्या सुमारे १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुंदर गणपती मुर्त्या तयार केल्या आणि याच बनवलेल्या गणपती बाप्पांची स्थापना मुले आपल्या घरी करणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरीच एका कुंडीमध्ये बाप्पाचे विसर्जन करून त्यात एक झाड लावण्याचा संकल्प करण्यात आला. 





त्यामुळे काही प्रमाणात का होईना पर्यावरणाचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी समता स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे, लायन्स क्लबचे राम थोरे, अक्षय गिरमे, सुमित भट्टड, सुरेश शिंदे, पंकज ठोळे, सुजित वरखेडे तर लिओ क्लबचे आदित्य गुजराथी, पृथ्वी शिंदे, ओंकार भट्टड, माधव बजाज तसेच समता स्कूलच्या मुख्याध्यापिका लिझा बर्धन व इतर शिक्षक उपस्थित होते. यावेळी मुलांना अनिकेत सोनवणे, साक्षी सोनवणे आणि मयूर जाधव यांनी मार्गदर्शन केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत