सोनगाव/वेबटीम:- सोनगाव ग्रामपंचायत च्या 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतुन सुमारे सात लाखांचे विविध विकासकामांचे भुमीपुजन रणरागिणी महिला म...
सोनगाव/वेबटीम:-
सोनगाव ग्रामपंचायत च्या 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतुन सुमारे सात लाखांचे विविध विकासकामांचे भुमीपुजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा मा सौ.धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले.वित्त आयोगातुन ग्रामपंचायत ने अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची खोल्या दुरूस्ती.तसेच
अनापवाडी अंगणवाडी साठी स्वयंपाक खोली बांधणे.व
अनापवाडी कमानीपासुन ओढ्यापर्यत पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन चे कामे प्रस्तावित करून मंजूर झालेल्या कामांचे आज अनापवाडी येथे भुमीपुजन करण्यात आले असुन या यावेळी धनश्रीताई विखे पाटील यांनी उपस्थित महीलासह ग्रामस्थांना कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाबाबत,लसीकरणाबाबत,तसेच आरोग्य विषयी विषेश मार्गदर्शन केले सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप बोलताना म्हणाले की आमच्या परीसरावर विखे पाटील कुटुबीयांचे विषेश प्रेम व स्नेह आहे, खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठ्याचे सुमारे 16 कोटी रुपयांचे काम मार्गी लागले त्याबद्दल त्याचे आभार मानले.कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब सजन होते. यावेळी सरपंच अनिल अनाप,उपसरपंच किरण पाटील अंञे,सुभाष पाटील अंञे, व्हा.चेअरमन विनोद अंञे,एजाज तांबोळी,संदीप अनाप,कैलास भोत,सुभाष ब्राम्हणे,चंद्रकांत अनाप,शरद अंञे,भगवान धनवट,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष नारायण धनवट,अल्पसंख्यांक अध्यक्ष मोहम्मदभाई तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती चे अरूण अनाप संतोष अनाप ,वायदंडे सर,आरोग्य अधिकारी डाॅ थोरात ,ग्रामविकास अधिकारी व्ही बी थोरात,आशा सेविका, अंगणवाडी सेविका,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सुञसंचालन साहेबराव अनाप यांनी केले तर आभार उपसरपंच किरण पाटील अंञे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत