कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय यांच्या संकल्पनेतून मंगळवारी (ता.१४) दुपार...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय यांच्या संकल्पनेतून मंगळवारी (ता.१४) दुपारी ३ वाजता पार पडलेल्या विनाशुल्क नोकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय यांच्या संकल्पनेतून आठवी ते दहावी मल्टीस्किल व ऑटोमोबाईल्स विषय घेऊन पुढे आयटीआय, पदविका, पदवी व इतर विद्यार्थ्यांनी अमास स्कील व्हेंचर्स असेन्सिव्ह एजुकेर लिमिटेड व स्टाफ ब्लूम चाकण यांच्या सहकार्याने प्रथमच आढाव विद्यालयात विनाशुल्क नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष तथा अध्यक्ष विजय वहाडणे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य विनीत वाडेकर, प्रमोदकुमार पाटील, विजय आढाव, राहुल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. तर मेळावा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र वानखेडे, अमोल काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत