रस्त्याच्या न्यायालयीन वादात आ काळे यांनी मध्यस्थी करावि:- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रस्त्याच्या न्यायालयीन वादात आ काळे यांनी मध्यस्थी करावि:- अँड.नितीन पोळ

कोपरगाव(प्रतिनिधी):- कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून श्रेय वादाच्या लढ्यात रस्त्याचे काम न्यायालयीन लढाईत अडकून पडले असुन कोपर...

कोपरगाव(प्रतिनिधी):-

कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून श्रेय वादाच्या लढ्यात रस्त्याचे काम न्यायालयीन लढाईत अडकून पडले असुन कोपरगाव तालुक्याचे प्रथम नागरिक व आमदार या नात्याने  रस्त्याच्या न्यायालयीन वादात आ आशुतोष काळे यांनी मध्यस्थी करावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की ,कोपरगाव तालुक्यात अस्मानी सुलतानी संकटात नेहमीच काळे कोल्हे परिवार धावून येतात तसेच ज्या ठिकाणी राजकारण करायचे त्या ठिकाणी राजकारण सुरूच असते मात्र कोपरगाव शहर व तालुक्याचे पालक म्हणून नेहमीच ही दोन्ही कुटुंबे समोर येत असतात 




 कोपरगाव शहराच्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून मागील काही दिवसांपूर्वी नगर पालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामे मंजूर झाली त्यास सत्ताधारी कोल्हे गटाने विरोध केला सदर कामे जिल्हाधिकारी यांच्या कडून मंजूर झाली मात्र पुन्हा या आदेशाला ना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली


कोल्हे गटाने मोजक्याच चार- सहा कामाला आक्षेप असल्याचे सांगितले तर एकाच ठरावात 28 कामे असल्याने व मा जिल्हाधिकारी व उच्च न्यायालयात त्या आदेशाला स्थगिती मिळाली .मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कोपरगाव शहरातील एकही रस्ता पायी चालण्या योग्य राहिला नाही .नुकतीच नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी  पत्रकार परिषद घेऊन "जेवढे काम -तेवढे पैसे" अशी भूमिका मांडली 

आगामी निवडणुक लक्षात घेऊन आरोप प्रत्यारोप होत राहणार लगेच मात्र सर्व सामान्य माणसाला त्यांनी भरलेल्या कराच्या रूपाने योग्य व माफक अशा रस्ते व पाणी या सुविधा मिळणे आवश्यक आहे मात्र श्रेय वादाच्या राजकारणात सर्व सामान्य नागरिकांचे हाल होत  आहेत या पूर्वी देखील काळे कोल्हे यांनी नगर पालिकेत "समझोता एक्सप्रेस" चालवली होती आता नागरिकांची सहनशीलता संपली असून  आ आशुतोष काळे यांनी आमदार व तालुक्याचे प्रथम नागरिक या नात्याने वादग्रस्त कामे काही काळ बाजूला ठेऊन उर्वरित कामे सुरू व्हावी मात्र  केवळ नगर पालिका निवडणूक डोळ्यासमोर समझोता एक्सप्रेस न राबवता ज्या प्रमाणे रस्त्याच्या कामाविषयी आरोप प्रत्यारोप सुरू आहे तेवढ्याच ताकदीने कामे उत्कृष्ट व दर्जेदार व्हावी म्हणून सत्ताधारी व विरोधक यांच्यात समन्वय घडून आणावा व कोपरगाव शहरातील रखडलेल्या रस्त्याची कामे सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत