जनतेचा खोटा कळवळा, हि तर कोल्हेंची दुतोंडी भूमिका - रावसाहेब साठे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जनतेचा खोटा कळवळा, हि तर कोल्हेंची दुतोंडी भूमिका - रावसाहेब साठे

  कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रास सहन करीत आहे. या रस्त्यांच्या कामा...

 कोपरगाव प्रतिनिधी:-



कोपरगाव शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रास सहन करीत आहे. या रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन देखील या रस्त्यांच्या कामांना विरोध करण्यासाठी आपल्या नगरसेवकांना न्यायालयात पाठवायचे. व दुसरीकडे नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी काही संघटनांनी या खड्ड्यात मुरूम टाकला तर चिखल झाला म्हणून ओरडायचे व जनतेची काळजी असल्याचा खोटा कळवळा दाखवायचा हि कोल्हे यांची दुतोंडी भूमिका असल्याची टीका सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष रावसाहेब साठे यांनी केली आहे.



 कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दोन दिवसापूर्वी काही संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मुरूम टाकून खड्ड्यांमुळे होत असलेल्या नागरिकांच्या यातना कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे या मुरुमाचा काही ठिकाणी चिखल झाला. यावरून कोल्हेंनी आपल्या चेल्यांच्या मार्फत नागरिकांच्या आरोग्याची काळजी दाखवून प्रसिद्धी पत्रक जाहीर केले. 


त्याबाबत साठे यांनी एकीकडे कामाला विरोध करायचा व दुसरीकडे नागरिकांची काळजी दाखवायची अशी दुटप्पी भूमिका आजवर कोल्हे यांनी चांगल्याप्रकारे बजावली असल्याचे म्हटले आहे. डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे डांबर टाकूनच बुजवले जातात त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला काम करून द्यावे लागते. मी या भागातील रहिवाशी असून या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना किती त्रास होतो हे मी स्वत: अनुभवत आहे. मात्र विकास कामांना विरोध करून न्यायालयातून स्थगिती आणायची. कोणी जर चांगले काम करीत असेल तर आपल्या बगलबच्च्यांना पुढे करून उलट-सुलट स्टेटमेंट देवून नागरिकांची दिशाभूल करायची हे जनतेने ओळखले आहे.


  तुम्हाला जर खरोखर नागरिकांची काळजी होती तर २८ विकासकामांना विरोध का केला? असा सवाल साठे यांनी विचारला असून नागरिकांची जर तुम्हाला एवढी काळजी आहे तर ज्या संघटनांनी त्या खड्ड्यात मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला त्याठिकाणी डांबरीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करावे तुम्हाला कोणी अडवले असा प्रतिप्रश्न केला आहे. कोपरगाव नगरपरिषदेत ठराव कधी झाला,२८ विकासकामांना कोपरगाव नगरपरिषदेने मंजुरी देवून किती दिवस झाले. मागील एक वर्षापासून खराब रस्त्यांचा त्रास नागरिक सहन करीत असतांना तुम्हाला नागरीकांच्या आरोग्याची काळजी वाटली नाही का? तुम्हाला जर जनतेच्या आरोग्याची खरंच काळजी असती तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी २८ विकासकामांना दिलेल्या मंजुरीला न्यायालयात आवाहन दिलेच नसते. हे कोपरगावची जनता जाणून आहे त्यामुळे यापुढे दुतोंडी भूमिका घेऊन जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम बंद करा व नागरिकांच्या भावनांशी खेळू नका असे साठे यांनी सांगितले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत