नगरच्या एलसीबी पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील नामदेवला घेतले ताब्यात! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगरच्या एलसीबी पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील नामदेवला घेतले ताब्यात!

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी:-         राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर य...

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी:-



        राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून जेरबंद केला आहे. मंगळवारी सकाळी पुणे बस स्थानक अहमदनगर येथुन पलायन करण्याच्या बेतात असलेला आरोपी नामदेव मामा या वेटरकाम करणाऱ्या आरोपीस एलसीबीने ताब्यात घेतले आहे.


         राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत  हॉटेल साक्षीमध्ये झोपलेल्या सोनू नामदेव छत्री (वय २७, रा. जोडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) याची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्याच्या सोबत असणारा दुसरा वेटर नामदेव केशव दराडे (वय ३०, रा. बोधेगाव, ता. शेवगांव) हा घटना घडल्यापासून फरार होता

         या फरार वेटरवर पोलिसांचा संशय होता त्याच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली होती.त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील रवाना झालं होतं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अहमदनगर येथील बसस्थानकातुन ताब्यात घेतला आहे.



                राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात राहुरी पोलीसांना अपयथ आले.राहुरी अनेक गुन्ह्यातील आरोपी एलसीबीने शिताफीने पकडले असल्याने राहुरी पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.


      स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ दिवटे ,गणेश इंगळे, सोपान गोरे,मनोहर गोसावी,  विश्वास बेरड,दत्तात्रेय इंगळे, सुनील चव्हाण, दीपक शिंदे,शंकर चौधरी,रवी सोनटक्के,सागर ससाने,शिवाजी ढाकणे, रवींद्र घुंगासे ,रवींद्र गायकवाड, रोहित यमुल, विनोद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे आदिंच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.



दरम्यान खून प्रकरणातील आरोपी नामदेव यास एलसीबीने अटक केल्याने राहुरी येथील हॉटेल साक्षीचे मालक शरद म्हसे,  दगडू म्हसे, ऋषि देवरे,  प्रवीण वराळे आदींनी एलसीबीचे अनिल कटके यांचा सन्मान केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत