टाकळीभान येथे फर्निचर दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टाकळीभान येथे फर्निचर दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले

  श्रीरामपूर(वेबटीम):- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पत्रकार चंद्रकांत लांडगे यांचे भोकर परिसरातील श्रीरामपूर नेवासा राज्य मार्...

 श्रीरामपूर(वेबटीम):-


श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पत्रकार चंद्रकांत लांडगे यांचे भोकर परिसरातील श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गालगत असणारे फर्निश प्लाझा हे फर्निचर व गृहउपयोगी वस्तूचे दालन अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान फोडून ४२ हजार ४०० रूपयांचा माल चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.



     या बाबतचे सविस्तर माहिती अशी की, टाकळीभान येथील पत्रकार चंद्रकांत दादा लांडगे यांच्या मालकीचे भोकर परिसरात फर्निश प्लाजा हे फर्निचर व  गृहउपयोगी वस्तूचे प्रशस्त दालन आहे. गुरूवारी रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दालनाचे मागील बाजूचे पत्र्याचे स्र्कू खोलून पत्रा वाकवून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी लांडगे हे मध्ये झोपलेले होते. मात्र कुठलाही आवाज न करता चोरट्यांनी आत प्रवेश करून दोन एल.इ.डी. व दोन होम थियटर असा एकूण ४२ हजार ४००रूपयांचा माल चोरून नेला. पहाटे ५ वाजेच्या दरम्यान लांडगे हे उठले असता ते पाठीमागील बाजूस चक्कर मारण्यास गेले असता त्यांना पत्रे उचकटलेले दिसून आले.  



      याबाबत आज्ञात चोरट्यांविरूध्द श्रीरामपूर तालूका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मधूकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद गायमुखे हे करीत आहे. या पुर्वीही टाकळीभान सह परिसरात अनेक ठिकाणी चोर्‍या झालेल्या असून अद्याप त्या चोर्‍यांचा तपास लागलेला नाही.

                    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत