लोकसेवकाचे आदर्श म्हणून तहसिलदार योगेश चंद्रे कोपरगावकरांच्या आठवणीत राहतील-पाटिल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोकसेवकाचे आदर्श म्हणून तहसिलदार योगेश चंद्रे कोपरगावकरांच्या आठवणीत राहतील-पाटिल

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन केलेले कार्य अजरामर असून लोकसेवकाचे आदर्श म्हणून कोपरगाव...

कोपरगाव/वेबटीम:-


कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन केलेले कार्य अजरामर असून लोकसेवकाचे आदर्श म्हणून कोपरगावकरांच्या आठवणीत राहतील.असे उद्गार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी काढले.

        कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांची जामखेड तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यानिमित्ताने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके यांनी त्यांचा सन्मान केला. 



  

कोपरगाव तालुक्यात तहसिलदार योगेश चंद्रे यांनी साधारण २ वर्ष ८ महिने कालावधीत अनेक प्रलंबित कामांचा झपाट्याने निपटारा केला.सकाळी ८ वाजता कार्यालयात येऊन दैनंदिन कामकाजाला सुरुवात करणारे रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांचे प्रश्नांची सोडवणूक केली.त्यांचे कामकाज आवाका पाहून महाराष्ट्रातील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून प्रशंसा केली आहे.




कोपरगाव तालुक्यात सन २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका, कोपरगाव तालुक्यात १९७२ नंतर प्रथमच झालेले पाझर तलाव (शिरसगाव-सावळगांव,उक्कडगांव,तिळवणी,धामोरी) लोकसहभागातून खोलीकरण, कोपरगाव शहरातील ५ नंबर तळे समृद्धीच्या माध्यमातून खोलीकरण,ग्रामीण भागात वहीवाटीची रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सामंजस्याने निपटारा करत तालुक्यातील अनेक रस्ते मोकळे करुन दिले. सन २०१९ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुरात कुठलीही जिवीत हानी होवू न देता कमीत कमी वित्त हानी टाळण्यासाठी ६२ तासांपेक्षा जास्त जागतावेळ देवून सांगली कोल्हापूर सारखी परिस्थिती होवू दिली नाही.जनसामान्य नागरिकांचे छोटे-मोठे सोडविताना आलेल्या प्रत्येकाला आदरपुर्वक वागणुक दिली.तसेच १०० वर्षांनंतर  आलेल्या कोरोना सारख्या महामारीत सुरुवातीला निर्भिडपणे प्रशासनाचे प्रमुख तहसिलदार योगेश चंद्रे यांचे टिम कॅप्टन म्हणून केले काम कोपरगाव तालुका पिढ्यानपिढ्या विसरु शकत नाही.तहसिलदार योगेश चंद्रे यांचे नेतृत्वाखाली कोविडच्या सुरुवातीला मार्च  २०२० मध्ये घटना व्यवस्थापक म्हणून काम करतांना शहर पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर, तालुका पोलिस निरीक्षक अनिल कटके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,शहरी आरोग्याच्या डॉ.गायत्री कांडेकर, तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, प्रभारी गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी, सुनील माळी यांचे सह आजी माजी लोकप्रतिनिधी,प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे कार्यरत असतांना यातील अनेक अधिकारी बदलून गेले तेव्हा नागरिकांनी हळहळ व्यक्त केली होती.



या सर्वांची मोट बांधणारे प्रमुखाची बदलीने जनसामान्यात हळहळ व्यक्त होत आहे.गेल्या सहा महिण्यापासून राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी हे कोपरगावचे आदर्श तहसिलदार आपल्या तालुक्यात यावे.या साठी इच्छुक होते.जामखेडला नियुक्तीने तहसिलदार योगेश चंद्रे यांची यांचे कार्याचा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया उमटली असून जामखेड नागरिकांनी स्वागत केले आहे. तहसिलदार योगेश चंद्रे यांचे कार्याची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदर्श तहसिलदार म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत