कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव शहरात चालक दिन साजरा करत शहरातील रिक्षा ,टॅक्सी,बस व ट्रक चालकांना...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव शहरात चालक दिन साजरा करत शहरातील रिक्षा ,टॅक्सी,बस व ट्रक चालकांना गुलाब पुष्प व मिठाई देत त्यांना चालक दिनाच्या शुभेच्छा देत चालक दिन साजरा केला आहे.
या प्रसंगी देसले यांनी प्रत्येक चालकास वाहतूकीचे सर्व नियम समजावून सांगत वाहने हळू व सुरक्षित चालविण्याची विनंती केली तसेच सर्व चालकांना व प्रवाश्यांना प्रवासी महिला सुरक्षा संदर्भात देखील बहुमूल्य मार्गदर्शन केले.
तसेच चालक आपल्या माध्यमातून करत असलेल्या प्रवासी सेवेचे कौतुक केले करत शहर पोलिस स्टेशनच्या पोलीस गाडीवरील चालक पोलिस अधिकारी साठे यांचा देखील देसले यांनी शाल पुष्पगुच्छ व मिठाई भरवत सत्कार करून चालक दिनांच्या शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत