कोपरगाव औद्योगिक वसाहतीला लवकरच नव्याने चौदा हेक्‍टर अतिरिक्त जमीन मिळणार:-विवेक कोल्हे. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव औद्योगिक वसाहतीला लवकरच नव्याने चौदा हेक्‍टर अतिरिक्त जमीन मिळणार:-विवेक कोल्हे.

कोपरगांव/वेबटीम:-     येथील नवउद्योजकांना व्यवसायासाठी जमीन मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, आता हे काम अंतिम टप्यात असून  वाढीव ...

कोपरगांव/वेबटीम:-

    येथील नवउद्योजकांना व्यवसायासाठी जमीन मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, आता हे काम अंतिम टप्यात असून  वाढीव १४ हेक्टर ६९ आर जमीन कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या ताब्यात  लवकर मिळेल अशी माहिती अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. 


   कोपरगांव औद्योगिक वसाहतीची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली त्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनअध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले.  अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  मागील सभेचे इतिवृत्त व्यवस्थापक श्री. लोखंडे यांनी वाचन केले.  विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. संचालक पंडीत भारुड यांनी प्रास्ताविकात औद्योगिक वसाहतीच्या वर्षभरातील कामांचा लेखाजोखा सादर केला. याप्रसंगी संचालक सर्वश्री. मुनिष ठोळे, केशव भवर, पराग संधान, डॉ. चंद्रशरेखर आव्हाड, सकृत शिंदे, जितेंद्रसिंग सारदा, रोहित वाघ, सोमनाथ निरगुडे, राजेंद्र शिंदे, वसंतराव देशमुख, भिमा संवत्सरकर, संदिप निकुभ, अरविंद कडलगु संजय जगदाळे, रविंद्र शिंदे, अभिजित राहतेकर, राजेंद्र रूपनर, कान्हाभाई रावलिया विश्वनाथ भंडारे, मंगेश सरोदे, सुधन चौधरी, ज्ञानेश्वर नाईकवाडे, निलेश वाके आदि सभासद्ऑनलाईन, ऑफलाईन उपस्थीत होते. 


  अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते विश्व इंडस्ट्रीजचे संदिप विश्वनाथ वाणी आदर्श उद्योजक व प्रशांत इंजिनियरिंग वर्क्सचे विश्वनाथ रंगनाथ भंडारे यांना नवउयोजक पुरस्कार प्रदान करण्यांत आले. 

            श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगांव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसाठी येथे कमी पडणाऱ्या सुविधांसाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र ३३ के. व्ही. व बे वीज पुरवठा प्रश्न मार्गी लागला तर अंतर्गत रस्ते, गटारीचे कामासाठी १ कोटी ९५ लाख ७६ हजार २७६ रुपये खर्चाचे प्रस्ताव दिले असुन पहिल्या टप्प्यात ४२ लाख ७९ हजार ४४५ रुपये मंजुर होऊन त्यातील ७५ निधी औद्योगिक वसाहतीकडे जमा होऊन कामही सुरु करण्यांत आले आहे. तर वसाहतीत नव्याने २५ लाख रुपये खर्चाचा सभामंडप, स्ट्रीट लाईट, संजीवनी क्लस्टर अंतर्गत ३०० महिलांना रोजगाराच्या उपलब्ध होत आहे. सर्व सभासद् व संचालक मंडळाचे सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. शेवटी व्यवस्थापक श्री. लोखंडे यांनी आभार मानले.


कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे विश्व इंडस्ट्रीजचे संदिप विश्वनाथ वाणी यांना आदर्श उद्योजक पुरस्कार अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते वार्षिक सर्वसाधारण सभेत नुकताच प्रदान करण्यात आला याप्रसंगी सर्व संचालक उपस्थित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत