राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय यांच्यावतीने शुक्रवार दि.१ ऑक्टोब...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय यांच्यावतीने शुक्रवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळत मोफत व्हेरोकोज व्हेन निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
विवेकानंद नर्सिंग होम येथे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सयाचे शल्यतंत्र विभागामार्फत व्हेरोकोज व्हेन निदान व उपचार शिबीरात पायांच्या रक्तवाहिन्यामध्ये गाठी तयार होणे, पाय सुजणे, पोटऱ्या दुखणे, पाय काळपट होणे, पायांना वारंवार वेदना होणे, पायाच्या ठिकाणी जखमा होणे याबाबत निदान, परीक्षण , समज गैरसमज, उपद्रव, उपचार-संरक्षण व आहाराविहार यावर तज्ञ डॉ.कांचन बोरकर(शेकोकार) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या शिबीराचे उद्घाटन विवेकानंद नर्सिंग होमचे अधीक्षक डॉ.बी.आर. पागिरे, प्राचार्य डॉ.व्ही.एस.कड, उपप्राचार्य डॉ.एस.के.बांगर आदींच्या उपस्थित संपन्न होणार आहे.तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व नाव नोंदणीसाठी ०२४२६-२५१६५९, २५१३५३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत