सात्रळ(वेबटीम):- दयनीय अवस्था असलेल्या सात्रळ -तांभेरे रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खासदार निधीतून मंजूर करून खासदार डॉ. सुजय विख...
सात्रळ(वेबटीम):-
दयनीय अवस्था असलेल्या सात्रळ -तांभेरे रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खासदार निधीतून मंजूर करून खासदार डॉ. सुजय विखे पाटीलांनी परिसरातील जनतेला दिलासा दिला आहे.
सात्रळ, सोनगाव धानोरे या आपल्या मतदारसंघातील हक्काचे मतदार असलेल्या गावामधील विविध विकास कामाचे भूमी पूजन समारंभ खा. विखेंच्या शुभहस्ते व मा. मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रमुख उपस्तिथ पार पडले. आपल्या चौफेर भाषणातून खा. सुजय विखेंनी उपस्थिताना माहिती देत सूचीत केले की जर वेग वेगळ्या विकास कामासाठी जर सर्व निधी केंद्र सरकार देत आहे तर राज्य सरकारचे काय योगदान काय असा प्रश्न उपस्तिथ केला. ऊर्जा खात्याच्या तालुकातच शेतकऱ्यांचे वीज जोडणी तोडली जात असून या बाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
आपल्या रोखठोक भाषणातून पत्रकारांनाही जिल्हातील विविध ठिकाणीराजकीय पुढाऱ्यानी उघडलेल्या कोविड सेंटर ची सत्य परिस्तिथी जनतेच्या नजरेत आणून देण्याचे आवाहन केले असून कोविड सेंटर खर्च, शासकीय सेवेतील डॉक्टरांची नेमणुका हे सर्व राज्य सरकारचा खर्च असून याबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच स्वर्गीय खा. बाळासाहेब विखे पाटील यांनी दाखवून दीलेल्या तत्वानुसारच गोर गरिबांची, सामान्य जनतेचि कामे करणार असल्याची ग्वाही दिली. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंनी आपल्या भाषणातून परिसरातील केलेल्या विकास कामे, ज़िल्हा बँकेच्या माध्यमातून राहुरी साखर कारखाना चालू करण्यासाठी चे योगदान, कामगार संपाबाबतची सकारात्मक भूमिकेच्या उल्लेख केला.
कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानि ऍड. अप्पासाहेब दिघे पाटील होते. प्रारंभी विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू यांनी खा. सुजय विखे पाटील व माजी मंत्री कर्डीले यांची jodi ही राम लक्ष्मण ची उपाधी देऊन परिसरातील अडीअडचणी ची माहिती धिली, धानोरे येथील प्रवरा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब दिघे यांना विकास कामे व त्यांचा मंजूर निधी या बाबत सखोल माहिती दीली.
या प्रसंगी विखे कारखाना चे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील, तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब, धानोरे सोसायटी चेअरमन किरण दिघे, डॉ. पोपटराव दिघे, रंगनाथ भिकाजी दिघे, भाजपा चे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे, जे. पी. जोर्वेकर, कारभारी ताठे पाटील, वसंतराव डुकरे, रमेशराव पन्हाळे, बाबुराव पडघलमल, मछिंद्र बालाजी दिघे, जयवंत दिघे,सुभाषराव अंत्रे, सात्रळ चे सरपंच सतिष ताठे, उपसरपंच तांबोळी, सोनगाव चे सरपंच अनाप, उपसरपंच किरण अंत्रे धानोरेचे सरपंच शामू माळी, उपसरपंच ज्ञानेश्वर दिघे, आर. बी . लांबे व ग्रामस्थ हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत