सात्रळ/वेबटीम:- येथे नगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील तसेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी कोविड लसीकरण केंद्रास ...
सात्रळ/वेबटीम:-
येथे नगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील तसेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी कोविड लसीकरण केंद्रास भेटू देऊन लसीकरण कार्यक्रम ची पाहणी केली तसेच लसीकरण ची जनजागृती करण्याचे आवाहन उपस्तिथ ग्रामस्तांना केले.
आधार कार्ड नोंदणी, पॅन कार्ड, ई कामगार नोंदणी मोहीम कॅम्पला भेटू देऊन केंद्र सरकारच्या योजना तळगाळातील जनतेला फायदा मिळून देण्यासाठीचे कार्यकर्त्यांना सूचना केल्या.तसेच सात्रळ माळावरील बांधकाम चालू असलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन कामासंदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
चालू केलेल्या समाज उपयोगी कामाची प्रशंसा करत कार्यकर्त्यांचा पाठीवर शाबासकी दिल्याने कार्यकर्तांना हुरूप आल्याचे चित्र दिसत आहे.या प्रसंगी या उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेले विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील, तहसीलदार शेख, कारखान्याचे माजी संचालक जे. पी. जोर्वेकर, प्रवरा बँकेचे माजी उपाध्यक्ष कारभारी ताठे, ग्रामपंचायत चे जेष्ठ सदस्य रमेशराव पन्हाळे, संचालक बाबुराव पडघल मल, साहेबराव नालकर, वसंतराव डुकरे, इंजिनियर घनवट, सात्रळ चे सरपंच सतिष ताठे, उपसरपंच तांबोळी, ग्राम विकास अधिकारी हैदरभाई पटेल, युवा सामाजिक कार्यकर्ते बिपीन ताठे, प्रमोद डुकरे, अतुल ताठे, सयाजी डुकरे, अमित ताठे, कडू, तलाठी पंडित, ग्रामस्थ मोठया संखेने उपस्तिथ होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत