राहुरी(वेबटीम):- राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आणि मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोज...
राहुरी(वेबटीम):-
राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आणि मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा द्वितीय, या स्पर्धेत इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या विराज ने खुल्या गटातून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.विराज सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुळापुर तालुका राहुरी ,जिल्हा अहमदनगर येथे इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत आहे. गतवर्षी ही विराज ने या स्पर्धेत बालगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. आणि या वर्षी चक्क खुल्या गटातून विराज ने तृतीय क्रमांक मिळवत राज्यस्तरावर आपल्या यशाची कमान चढती ठेवली आहे.
विराजने इयत्ता दुसरीच्या वर्गात असून तब्बल एकसष्ट पर्यंतचे पाढे तोंडपाठ केले आहेत. या सोबतच जुन्या काळातील अपूर्णांक पाढे म्हणजेच पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, एकोत्रे हे सर्व प्रत्येकी एक ते शंभर पर्यंत मुखोद्गत केले आहेत.
विराजच्या या तयारीसाठी त्याच्या शाळेतील मुख्याध्यापक जगन्नाथ भांगरे ,शिक्षक विवेकानंद खामकर आई सौ.रत्नमाला खामकर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.
विराजच्या या विराट यशाबद्दल केंद्रप्रमुख ठोंबरे , सहायक केंद्रप्रमुख गाडेकर विस्तार अधिकारी अनिता निऱ्हाळी तसेच गटशिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे. अवघ्या इयत्ता दुसरी च्या बालवयात विराजने खुल्या गटातही आपल्या जिद्दीने व प्रयत्नाने तृतीय क्रमांकावर आपल्या यशाची मोहर उमटवली आहे.याबाबत त्याचे गाव, तालुका जिल्हा व राज्यस्तरावरून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत