दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार

  अहमदनगर(वेबटीम):- ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाठी वाड्या वस्त्यावर फिरून विद्यार्थी व पालकांना आनलाईन शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. आर्थिकदृष...

 अहमदनगर(वेबटीम):-


ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाठी वाड्या वस्त्यावर फिरून विद्यार्थी व पालकांना आनलाईन शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थांना समाज माध्यामातून मदतीचा हात मिळवुन देत शिक्षणाची ओढ कायम ठेवणाऱ्या नेवासे तालुक्यातील शिरे गाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवंत शिक्षीका यांना राज्य सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार रोजी कोल्हापूर येथील भगवती हॉलमध्ये राज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे व अध्यक्ष भाऊसाहेब मरगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 



यावेळी राज्य सरपंच सेवा संघाच्या महिला अध्यक्षा प्रमिला एखंडे, उपाध्यक्षा वर्षा गिरी, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, जयदिप वानखेडे, उदयोन्मुख अभिनेत्री भार्गवी पुराणिक, राजेंद्र पुराणिक उपस्थीत होते.

यावेळी बोलताना संघाचे राजाध्यक्ष मरगळे म्हणाले, ग्रामीण शिक्षण क्षेत्रात काम करताना महिला शिक्षीका भगिनींना अनेक अडचणीचा सामना करत ज्ञानदानाचे काम करत असतात. कामात सातत्य ठेवत गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी सध्या कोरोनाच्या काळात औॅनलाईन शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थांना समाजमाध्यामातून मदतीचा हात देण्यात पुढाकार घेणाऱ्या दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय महिला शिक्षकभूषण पुरस्कार प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे.


 राज्य सरपंच सेवा संघा तर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखणिय कार्य करणाऱ्या सामाजिक, कला, शिक्षण, राजकिय, उद्योग, वैद्यकिय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्यास्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत